Sat, Jan 19, 2019 04:18होमपेज › Belgaon › कडोलीत आज साहित्य जागर

कडोलीत आज साहित्य जागर

Published On: Jan 14 2018 1:51AM | Last Updated: Jan 13 2018 11:35PM

बुकमार्क करा
कडोली : वार्ताहर

कडोली (ता. बेळगाव) मराठी साहित्य संमेलन रविवारी (दि.14) मराठी शाळेच्या आवारात संपन्‍न होत आहे. अध्यक्षस्थानी परराष्ट्र व्यवहार मंत्रालयाचे सचिव ज्ञानेश्‍वर मुळे राहतील. सकाळी 9.30 वाजता ग्रंथदिंडीला सुरुवात होईल. संमेलनाचे उद्घाटन उद्योगपती सुधीर दरेकर करतील. पहिल्या सत्रात अध्यक्षीय भाषण, दुसर्‍या सत्रात पुणे येथील सौरभ करडे यांचे स्वराज्याचे शिलेदार या विषयावर व्याख्यान, तिसर्‍या सत्रात मातीतल्या कवींचे कवी संमेलन,  चौथ्या सत्रात कथाकथन कार्यक्रम,  पाचव्या सत्रात निमंत्रितांचे कविसंमेलन होईल. परशराम कामती यांचे चित्रप्रदर्शन कलमेश्‍वर वाचनालयात मांडण्यात आले आहे.