Fri, Jul 19, 2019 05:41होमपेज › Belgaon › मठाधीश बनण्यासाठी ‘जात’ नाही अडसर

मठाधीश बनण्यासाठी ‘जात’ नाही अडसर

Published On: Jun 29 2018 12:08AM | Last Updated: Jun 28 2018 8:48PMबेळगाव : प्रतिनिधी

कर्नाटकात लिंगायत पंथियांची संख्या मोठी आहे. तसेच मठांची संख्याही तब्बल 11 हजार आहे. त्यापैकी 300 मठाधीशांनी एकत्र येऊन मठाधीश आणि स्वामी घडवण्यासाठी गुरुकूल स्थापन करण्याचा निर्णय घेतला आहे. समाजातील 12 बलुतेदारांपैकी कोणत्याही जातीमधील व्यक्ती गुरूकुलात शिक्षण घेऊन मठाधीश होऊ शकता. त्यासाठी जातीचा अडसर नाही, अशी माहिती कणेरी मठाचे अदृश्य काडसिध्देश्वर स्वामी यांनी दिली.

जगजंपी बजाज  येथे गुरुवारी पत्रकार परिषदेत स्वामी बोलत होते. ते म्हणाल, ‘लिंगायत हा हिंदू धर्मातील एक पंथ आहे. मठाधीश केवळ एका विशिष्ट धर्माचे असता कामा नये. त्यासाठीच स्वतंत्र गुरुकुल कणेरी मठ येथे सुरु करण्यात येणार आहे. गुरुकुलात इतर जाती-धर्मातील लोकांनाही प्रवेश असेल. सर्व वयोगटातील व्यक्तींना मोफत प्रवेश असून राहण्याची, खाण्याची व अध्ययन करण्याची सुविधा आहे. गुरुकुलात बसवेश्वरांंचे विचारव अद्वैत पंथाची शिकवण दिली जाणार आहे.अध्ययनाचा कालावधी 6 महिने ते 12 महिने असेल.  अशा रितीने गुरुकुलात मार्गदर्शन केले तर चांगले किर्तनकार, संगीतकार समाजामध्ये निर्माण होतील. विशेष म्हणजे तुकाराम महाराजांनी सांगितल्याप्रमाणे संसार करुन परमार्थ साधा या धर्तीवरही अध्ययन करता येईल.’

कर्नाटकात 300 मठाधीश असून त्यामध्ये सर्व जाती-धर्माचा समावेश आहे. 300 शाखा असून 33 समाजकार्ये केली जातात. शिक्षण, अनाथााश्रम, हॉस्पीटल, गोशाळा यासारख्या कामांचा समावेश आहे, अशी माहितीही स्वामींनी दिली.  शिरोली मठाचे शंकरारुढ स्वामी,  हल्याळ मठाचे हर्षानंद स्वामी, चिक्कूर मठाचे अद्वैतानंद स्वामी, रामदुर्गचे जगत्मानंद स्वामी, गणी येथील मठाचे चिन्मयानंद स्वामी, लिंगनूर मठाचे शिवपुत्र स्वामी उपस्थित होते.