Mon, May 20, 2019 20:36होमपेज › Belgaon › पौष्टिक आहार जबाबदारी मेडिकल कॉलेजची

पौष्टिक आहार जबाबदारी मेडिकल कॉलेजची

Published On: Mar 03 2018 1:52AM | Last Updated: Mar 02 2018 10:52PMबेळगाव : प्रतिनिधी

मानवाच्या आरोग्याला सकस आहाराची गरज आहे. पौष्टिक आहारासाठी गर्भवती महिला, लहान मुले यांना तृणधान्याची गरज आहे. यामुळे प्रकृती उत्तम राहू शकते. अशा प्रकारचा पौष्टिक आहार मिळवून देण्याची जबाबदारी वैद्यकीय महाविद्यालयांची आहे. या क्षेत्रात केएलई इस्पितळाने संशोधन चालविले आहे, ही समाधानाची बाब आहे. देशातील अनेक इस्पितळांच्या तुलनेत केएलई संस्थेचे कार्य सर्वोत्कृष्ट आहे, असे प्रतिपादन महिला आणि बालकल्याण मंत्री मनेका गांधी यांनी केले. 

केएलई संस्थेच्या डॉ. प्रभाकर कोरे इस्पितळात बालआरोग्य चिकित्सा केंद्र, अमृत दूध भांडार, प्रधानमंत्री जनऔषधी केंद्राचे उद्घाटन करून त्या बोलत होत्या. व्यासपीठावर कार्याध्यक्ष खा. डॉ. प्रभाकर कोरे, आ. महांतेश कवटगीमठ आदी मान्यवर उपस्थित होते.मंत्री मनेका गांधी म्हणाल्या, केएलई इस्पितळात माणुसकीच्या दृष्टीकोनातून रुग्णांची सेवा करण्यात  येते.

अंगणवाडीतील महिलांना सध्या पुरविण्यात येणार्‍या आहार पद्धतीत बदल झाला पाहिजे. पौष्टिक आणि सकस आहार मिळवून देण्याच्या उद्देशाने त्यांना पैसे देण्याची योजना राबविण्याचा विचार आहे. या प्रकारची योजना आसाम राज्यात सुरु असून ती यशस्वीपणे सुरु आहे. या योजनेमुळे भ्रष्टचाराला आळा बसणार आहे. अशा प्रकाराची केंद्र सरकारने गांभीर्याने दखल घेतली आहे. अंगणवाडी केंद्रासाठी अनेक योजना राबविण्याचा केंद्राचा विचार आहे.  

यावेळी डॉ. व्ही. एस. साधुनवर, शंकर मुनवळ्ळी, एस. सी. मेटगुड, एस. सी. कोळी, अशोक बागेवाडी, जयण्णा मुनवळ्ळी, अमित कोरे, डॉ. विवेक सावोजी, वैद्यकीय संचालक एम. व्ही. जाली, एन. एस. महांतशेट्टी आदी उपस्थित होते.