Wed, Jul 08, 2020 19:37होमपेज › Belgaon › कर्नाटक : काँग्रेसचे नेते राममूर्ती यांचा खासदारकीचा राजीनामा

कर्नाटक : काँग्रेसचे नेते राममूर्ती यांचा खासदारकीचा राजीनामा

Last Updated: Oct 17 2019 1:32AM
नवी दिल्ली : पुढारी ऑनलाईन 

कर्नाटकातील काँग्रेसचे नेते के. सी. राममूर्ती यांनी बुधवारी आपल्या राज्यसभा सदस्यत्वाचा राजीनामा दिला. येत्या काळात ते भाजपमध्ये प्रवेश करणार असल्याची जोरदार चर्चा आहे. 

राममूर्ती यांचा राजीनामा राज्यसभेचे उपसभापती एम. व्यंकय्या नायडू यांनी स्वीकारला असल्याची माहिती सूत्रांनी दिली. कर्नाटक काँग्रेसच्या बैठकांना मागील काही काळात राममूर्ती यांनी दांडी मारली होती. तेव्हापासून त्यांच्या पक्ष सोडण्याची चर्चा सुरू झाली होती. 

राममूर्ती यांनी गेल्या आठवड्यात भाजपच्या काही ज्येष्ठ नेत्यांची भेट घेतली होती. राममूर्ती यांचे कर्नाटकमध्ये शिक्षण संस्थांचे जाळे आहे. कर्नाटक काँग्रेसने मोठा विरोध केल्यानंतरही पक्षाने त्यांना २०१६ साली राज्यसभेवर पाठवून दिले होते. 

राजकारणात प्रवेश करण्यापूर्वी राममूर्ती भारतीय पोलिस सेवेत कार्यरत होते. राज्यसभेवर निवडून आल्यानंतर गतवर्षी त्यांची कार्मिक, जनसमस्या, कायदा आणि न्याय विषयावरील समितीवर सदस्य म्हणून नियुक्ती करण्यात आली होती.