Sun, Nov 18, 2018 09:12होमपेज › Belgaon › बेळगाव परिसरातील दुसरा परशुराम कोण?

बेळगाव परिसरातील दुसरा परशुराम कोण?

Published On: Jul 08 2018 1:43AM | Last Updated: Jul 07 2018 11:56PMबेळगाव  : प्रतिनिधी

पत्रकार गौरी लंकेश हत्या प्रकरणी  अटक करण्यात आलेल्या परशुराम वाघमारेच्या बेळगाव वास्तव्यातील धागेदोेरे शोधण्यासाठी एसआयटी पोलिसांनी तपासाला वेग दिला आहे. या संदर्भात कपिलेश्‍वर मंदिर परिसरात वास्तव्यास असणार्‍या तिघांंचा शोध सुरू असून तपास सुरु आहे. 

संशयितांची रेखाचित्रे तयार करण्यात आली आहेत. मात्र ती जाहीर करण्यात एसआयटी पोलिसांनी टाळले आहे. तर या प्रकरणाच्या तपासादरम्यान सीमकार्ड दिलेल्या व्यक्तीचे नावही परशुराम असल्याचे समोर आल्याने बेळगावमधील परशुराम कोण? या चर्चेला उधाण आले आहे. 

पत्रकार गौरी लंकेश  हत्या प्रकरणी बंगळूरच्या एसआयटीने संशयित परशुराम वाघमारेला 20 जूनरोजी  बेळगावात आणून त्याच्याकडून खानापूर परिसरातील काही भागाची पाहणी केली होती. त्याने खानापूर जंगल परिसरात बंदूक चालविण्याचे प्रशिक्षण घेतल्याचे तपासातून पुढे आले आहे. त्यानुसार तपासणी करण्यात आली.

एसआयटी पोलिस बेळगाव परिसरात या प्रकरणाची संबंधित असणार्‍यांचा शोध घेण्यात गुंतली आहे. याप्रकरणामध्ये सापडलेल्या सीमकार्डप्रकरणी तपास हाती घेण्यात आला असून यामध्येही परशुराम हे नाव पुढे आले आहे. त्यामुळे बेळगावमधील परशुराम कोण? याची चर्चा केली जात आहे. 

20 जून रोजी संशयित आरोपी परशुराम वाघमारेला बेळगावात घेऊन आलेल्या एसआयटीने खानापूर परिसरासह जांबोट भागात प्रशिक्षण स्थळांची माहिती घेतली होती. त्यानंतर वाघमारेल काही स्थानिकांनीही मदत केली असल्याचे समोर आले आहे. त्याप्रमाणे एसआयटीने त्या स्थानिक तरुणांचा शोध घेण्यावर भर दिला आहे. यामध्ये हलगा-बस्तवाड येथील व्यक्तींचे नाव घेतले जात आहे. तर कपिलेश्‍वर परिसरात वास्तव्यास असताना मदत करण्यात आलेल्याचीही तपासणी करण्यात येत आहे.

संबंधितांची रेखाचित्रे एसआयटीकडे आहेत. मात्र ती जाहीर करण्यात आलेली नाहीत. या तिघांनी परशुरामला बेळगावातील वास्तव्य काळात जेवण पुरवणे, सिमकार्ड पुरवणे, जाण्याची येण्याची व्यवस्था करणे अशी मदत केल्याचा संशय आहे. त्यामुळे गैरीलंकेश हत्येप्रकरणी बेळगावचे नाव पुन्हा एकदा चर्चेत आले आहे.