Mon, Apr 22, 2019 11:40होमपेज › Belgaon › तालुक्यातील पंचायती रडारवर

तालुक्यातील पंचायती रडारवर

Published On: Dec 27 2017 1:23AM | Last Updated: Dec 26 2017 8:46PM

बुकमार्क करा

जांबोटी : विलास कवठणकर      

   एका संस्थेच्या अहवालानुसार कर्नाटक भ्रष्टाचारात क्रमांक एकवर असल्याचे स्पष्ट करण्यात आल्यानंतर आता खानापूर तालुक्यातही अशीच परिस्थिती आहे. गेल्या दहा वर्षांत तालुक्यातील मोजक्याच पंचायती वगळता उर्वरित पंचायती या-ना त्या कारणाने चर्चेत आहेत. त्यामुळे विकास करण्याऐवजी भकास होत असल्याचे यावरुन स्पष्ट होत आहे. यात रोजगार हमी योजनेत मोठ्या प्रमाणात रव्यवहार चालला आहे. शिवाय इतर विकासकामातही सावळा गोंधळ सुरु असल्याने लोकायुक्तांनी तालुक्यातील काही पंचायतींची चौकशी सुरु केली आहे. त्यामुळे सदस्य आणि पीडीओंचे धाबे दणाणले आहेत.

तालुक्यात अलीकडच्या दहा वर्षांत पंचायत क्षेत्रात विकास कमी, भकास अधिक असे भयानक चित्र आहे. पंचायत म्हणजे पैसे कमावण्याचे ठिकाण  असे काही सदस्यांना वाटत असून त्यांच्याकडून अनेक योजनांमध्ये गैरव्यवहार चालला आहे.  पीडीओ आणि कर्मचार्‍यांचाही याला वरदहस्त लाभला आहे. त्याविरोधात नागरिकांनी अनेकवेळा तक्रारी करुनही वरिष्ट अधिकार्‍यांकडून याची दखल घेतली जात नाही. उलट अधिकार्‍यांकडून भ्रष्टाचार्‍यांना पाठीशी घातले जाते. त्यामुळे याबाबत न्याय मागायचा कोणाकडे? असा प्रश्‍न नागरिकांना पडला आहे. तालुक्याच्या नंदगड ,जांबोटी, गर्लगुंजी विभागातील बहुतेक पंचायती कायम चर्चेत असतात. त्याविरोधात आवाज उठवला जातो,पण सर्वांच्याच अंगलट येणार असल्याने विरोध असलेले सदस्य एकत्र येऊन अशी प्रकरणे दाबता. रोजगार हमी , शौचालय, गोटा,घरकुल आदी योजनांमध्ये मोठ्या प्रमाणात गैरव्यवहार चालला आहे. याबाबत अधिकार्‍यांनी चौकशी केली असता कागदपत्रांची अदलाबदल केली जात असल्याचे स्पष्ट होत आहे.