Tue, Sep 25, 2018 10:33होमपेज › Belgaon › धूमस्टाईल दुचाकीस्वार प्रेमीयुगुलांचा वावर

धूमस्टाईल दुचाकीस्वार प्रेमीयुगुलांचा वावर

Published On: Feb 04 2018 9:57PM | Last Updated: Feb 04 2018 8:41PMजांबोटी: वार्ताहर

बेळगाव व्हाया जांबोटी चोर्ला मार्गावर दिवसेंदिवस अपघातात वाढ होत आहे. अशातच धूमस्टाईलने दुचाकी चालवणार्‍या युवकांमुळे इतर वाहनधारक हैराण झाले आहेत. तसेच या भागात प्रेमीयुगुलांचा वाढता वावर चिंताजनक बनला असून यांना रोखणार कोण, असा प्रश्‍न निर्माण झाला आहे. स्थानिक पोलिसांचेही याकडे दुर्लक्ष झाले आहे.   बेळगाव, धारवाड, हुबळीसह लगतच्या शहरांमधील कॉलेजमध्ये शिकणारे विद्यार्थी-विद्यार्थिनींचे टोळके कुसमळी ते चोर्ला घाटापर्यंत ठिकठिकाणी नजरेस पडते. चोर्ला मार्गावर धूमस्टाईल युवकांचा वावर वाढला आहे. यात साधारण अकरावी-बारावी ते पदवीच्या पहिल्या वर्षातील विद्यार्थ्यांचा सहभाग लक्षणीय आहे.

चोर्ला मार्गावरुन जांबोटीकडे येणार्‍या एकाही युवक-युवतीकडे वाहन परवाना नसतो. शिवाय त्यात अल्पवयीन दुचाकीस्वारांचीही संख्या अधिक आहे. असे असताना जांबोटी पोलिसांकडून याबाबत कोणतीही कारवाई होताना दिसत नाही.  चोर्ला मार्ग, कणकुंबी, जांबोटी स्थानकावर धिंगाणा घालणार्‍या युवकांची संख्या वाढती असून या तुलनेत पोलिस कारवाई शून्य आहे. अनेकवेळा जांबोटी स्थानकावर वाहतुक कोंडी झालेली असताना पोलिसांचा पत्ताच नसतो. अशा पोलिसांची बदली करण्याची मागणी होत आहे.