Wed, Nov 21, 2018 09:14होमपेज › Belgaon › रामनगरजवळ महिलेचा खून?

रामनगरजवळ महिलेचा खून?

Published On: Mar 16 2018 1:23AM | Last Updated: Mar 15 2018 11:22PMरामनगर/लोंढा :  वार्ताहर

रामनगरपासून (ता. जोयडा) काही अंतरावर गोवा-बेळगाव मार्गावर अस्तोली पुलाखाली सुमारे 35 वर्षाच्या महिलेचा मृतदेह गुरुवारी आढळला. तिचा खून झाला असावा असा अंदाज पोलिसांनी वर्तवला आहे. 

महिलेच्या अंगावर काळ्या रंगाची जीन पँट, पांढर्‍या निळ्या रंगाची टी-शर्ट असून शर्टावर सायकल चालवत असलेले कार्टून आहे. तिच्या डाव्या हातावर स्टार चिन्ह असून ही महिला गोव्यातील असावी, असाही अंदाज पोलिसांनी व्यक्‍त केला. मृताच्या हातावर लाल दोरा आहे. अस्तोली पुलाखाली मृतदेह पाहून शेतकर्‍यांनी घटनेची माहिती रामनगर पोलिसांना दिली.