Wed, Apr 24, 2019 15:31होमपेज › Belgaon › बेळगाव,खानापुरात फज्जा

बेळगाव,खानापुरात फज्जा

Published On: Jan 26 2018 1:22AM | Last Updated: Jan 25 2018 10:42PMबेळगाव, बंगळूर : प्रतिनिधी  

म्हादईचे पाणी उत्तर कर्नाटकाला मिळवून देण्यासाठी वाद न्यायालयाबाहेर मिटवावा, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी हस्तक्षेप करावा, तसेच पिण्याच्या पाण्यासाठी राखून ठेवण्यात आलेल्या मेकेदाटू धरणाचे पाणी कर्नाटकाला मिळवून द्यावे, या मागण्यांसाठी कन्‍नड  संघटनांनी गुरुवारी पुकारलेल्या कर्नाटक बंदला राजधानी बंगळूरसह हुबळी, धारवाड, नरगुंद, गदग, दावणगेरी, हावेरी आदी जिल्ह्यांत संमिश्र प्रतिसाद मिळाला. मात्र, खानापूरसह बेळगाव शहर आणि जिल्ह्यात फज्जा उडाला.

बेळगावात परिवहनची बंद राहिलेली बससेवा वगळता सर्व व्यवहार सुरळीत सुरू होते. मुख्य बाजारपेठेतील गणपत गल्ली, मारुती गल्ली, पांगुळ गल्ली, खडेबाजार, बापट गल्ली, रामदेव गल्ली आदी भागातील व्यापार्‍यांनी सुरुवातीला काही वेळ दरवाजे अर्धेच उघडून दुकाने चालू केली होती. दुपारी 12 वाजता सर्व व्यापार्‍यांनी दुकाने पूर्णपणे उघडली. दुपारनंतर बाजारपेठेत गर्दी वाढली. 

बससेवा ठप्प

शहरासह ग्रामीण भागात सकाळच्या सत्रात बससेवा सुरू होती.  मात्र, सकाळी 10 नंतर बससेवा ठप्प झाली. शिवाय, लांब पल्ल्याच्या हुबळी, धारवाड सेवा वगळता कोल्हापूर, पुणे, मुंबई आदी भागातील बससेवा सुरळीत होती. शिवाय खासगी प्रवासी वाहतूक सुरू होती.