Mon, Jun 17, 2019 02:39होमपेज › Belgaon › ‘सविता’मुळे घडणार आयर्लंडच्या कायद्यात बदल

‘सविता’मुळे घडणार आयर्लंडच्या कायद्यात बदल

Published On: May 24 2018 1:32AM | Last Updated: May 24 2018 1:28AMबेळगाव ः प्रतिनिधी

मूळच्या बेळगाव श्रीनगर येथील असणार्‍या डॉ. सविता हालप्पनवर  (वय 31) सहा वर्षांपूर्वी आयर्लंडमधील गर्भपात नियंत्रण कायद्याच्या बळी ठरल्या होत्या. तो कायदा आता बदलला जाण्याची शक्यता आहे. त्यासाठी 25 मे रोजी जनमत आजमावले जात आहे. 

12 आठवड्यांपेक्षा जास्त कालावधी झाला असेल तर गर्भपात करावा की नाही, यासाठी आयर्लंडचे नागरिक मतदान करतील. कायद्याच्या विरोधात मतदान झाले तर कायदा बदलला जाईल. सध्या 12 आठवड्यांनंतर गर्भपात केला जात नाही. 

दंतवैद्य असणार्‍या सविता हालप्पनवर आयर्लंडमध्ये पतीसमवेत राहत होत्या. प्रथमच गर्भवती झाल्यानंतर पाठदुखीच्या त्रासामुळे 21 ऑक्टोबर 2012 रोजी त्या आयर्लंडमधील रुग्णालयात गेल्या. त्यावेळी गर्भ सतरा आठवड्यांचा होता आणि गुंतागुंत निर्माण झाली. डॉ. सविता यांच्यासह पती व कुटुंबीयांनी गर्भपात करण्याचा आग्रह केला. मात्र, गर्भपात नियंत्रण कायद्यानुसार कठोर शिक्षा होत असल्याने डॉक्टरांनी आपले हात बांधले गेल्याची असमर्थता दर्शविली. त्यानंतर नैसर्गिक गर्भपाताची वाट पाहण्याचा निर्णय डॉक्टरांनी घेतला; पण प्रकृती बिघडत जाऊन 28 ऑक्टोबर 2012 रोजी सविता यांचा मृत्यू झाला. 12 आठवड्यांपेक्षा जास्त कालावधी झाला असेल तर गर्भपात करता येत नाही, असा कायदा असल्यामुळे डॉ. सविता यांचा बळी गेला. त्यानंतर  हे वृत्त जगभर पसरले. दुसर्‍याच दिवशी 14 नोव्हेंबरला सुमारे बारा हजार लोकांनी पार्नेल स्न्वेअर ते मेरिऑन स्न्वेअरपर्यंत कँडल मोर्चा काढला. 

जागतिक पातळीवर गांभीर्याने दखल घेण्यात आल्यामुळे आता आयर्लंड सरकारने कायद्यात जनतेच्या मागणीनुसार दुरुस्तीचा निर्णय घेतला आहे. कायद्याविरोधात मतदान झाल्यास त्यात आवश्यक दुरुस्ती केली जाईल. सविता यांच्या आई अक्कमहादेवी याळगी यांनी आयर्लंडच्या नागरिकांनी कायद्यात दुरुस्तीसाठी मतदान केल्यास आपल्या मुलीचा तो विजय असेल, असे म्हटले आहे.

रिस्थिती काही प्रमाणात बदलली आहे. सध्याचे पंतप्रधान लिओ वराडकर यांचे वडील भारतीय आणि आई आयरिश आहे. त्यामुळे त्यांचे भारताशी चांगले संबंध आहेत. त्यांच्यासमोर घडलेली घटना मांडली आहे. सध्याच्या घडामोडी सकारात्मक आहेत.    

- अंदानप्पा याळगी, सविता यांचे वडील