Wed, May 22, 2019 11:12होमपेज › Belgaon › ड्रेनेज खडड्यांनी अपघाताला आमंत्रण

ड्रेनेज खडड्यांनी अपघाताला आमंत्रण

Published On: May 23 2018 1:07AM | Last Updated: May 22 2018 7:41PMबेळगाव : प्रतिनिधी

शहराच्या विकासासाठी कोट्यवधी रुपये खर्चून स्मार्ट सिटी करण्याचा प्रयत्न सुरू आहे. दुसरीकडे रस्त्यात असणार्‍या ड्रेनेज खड्ड्यांमुळे वाहतुकीला अडथळा निर्माण झाला आहे. यामुळे नागरिकांतून संताप व्यक्त करण्यात येत आहे. मनपाने तातडीने या ठिकाणी दुरुस्ती करावी, अशी मागणी करण्यात येत आहे.शहरातील मुख्य रस्ता म्हणून ओळखला जाणार्‍या किर्लोस्कर रोडवर अनेक वर्षापासून ड्रेनेज खड्डा आहे. या रस्त्यावर सातत्याने वर्दळ असते. या भागात मुख्य बाजारपेठ आहे. बाजारपेठेत जाण्यासाठी सर्रास याच रस्त्याचा वापर केला जातो. त्यांना याचा अडथळा सहन करावा लागतो.

खंजर गल्लीच्या कोपर्‍यावरदेखील धोकादायक ड्रेनेज खड्डा दुर्लक्षित आहे. याबाबत अनेकवेळा या भागातील नागरिकांनी मनपाकडे विनंती केली. परंतु, त्याकडे सातत्याने दुर्लक्ष चालविले आहे. या भागातून शनिवार खुट, कोर्ट व जिल्हाधिकारी कार्यालय भागात जाणार्‍या नागरिकांची वर्दळ असते. अनेक सरकारी कार्यालये असून त्यामुळे लोकांची वर्दळ अधिक असते. अपघाताची शक्यता अधिक आहे. मुख्य रस्त्यावर असे ड्रेनेज खड्डे अनेक भागात दिसून येत आहेत. ऐन वर्दळीच्या भागात खड्डे असल्याने दुचाकीधारकांना सांभाळून वाहने हाकावी लागतात. रस्त्याच्या उंचीपेक्षा अधिक या खडड्यांची आहे. त्यामुळे वाहने याला धडकतात व अपघात घडतात. याच्या दुग़स्तीची मागणी अनेक सामाजिक संघटनांनी केली आहे. मध्यंतरी एका खड्ड्यात भटकी जनावरे पडली होती. यावेळी काही सामाजिक संघटनांनी धाव घेऊन जनावरांना जीवदान दिले होते.  याचा सर्वाधिक त्रास पावसाळ्यात होण्याची शक्यता आहे.  सामाजिक संघटनांनी याबाबत पुढाकार घेऊन आवाज उठवून प्रशासनाला जाग आणावी.

मनपाचे दुर्लक्ष

रस्त्यावरील ड्रेनेज खड्ड्यांची अडचण पावसाळ्यात अधिक होणार आहे. रस्त्यावर पाणी साचल्यानंतर हे धोकादायक ड्रेनेज खड्डे दिसून येत नाहीत. यासाठी पावसाळ्यापूर्वी असे ड्रेनेज खड्डे दुरुस्तीचे काम मनपाने हाती घेणे अत्यावश्यक आहे. याबाबत नगरसेवक आणि अन्य लोकप्रतिनिधींनी आवाज उठविल्यास पावसाळ्यापूर्वी मनपाकडून दुरुस्ती होणे शक्य होईल. यासाठी मनपाच्या पुढाकाराची आवश्यकता आहे. स्मार्ट सिटीची केवळ घोषणा करून शहर स्वच्छ आणि सुंदर होणार नसून याप्रकारचे अडथळे प्रथम दूर केले पाहिजेत.