Wed, Aug 21, 2019 02:24होमपेज › Belgaon › भविष्यासाठी पोस्टात करा गुंतवणूक

भविष्यासाठी पोस्टात करा गुंतवणूक

Published On: Aug 27 2018 1:12AM | Last Updated: Aug 26 2018 11:23PMबेळगाव : सतीश जाधव 

भारतीय पोस्ट खात्यात  प्रामुख्याने सिनीयर सिटीजन स्कीम, सुकन्या समृद्धी, पीपीएफ, किसान विकास पात्रा व नॅशनल सेव्हिंग सर्टिफिकेट या योजनांना चांगला प्रतिसाद मिळत आहे. या योजनांची माहिती खालीलप्रमाणे...

सिनीयर सिटीजन स्कीम (5 वर्षे) ः कमीत कमी 1 हजार ते 15 लाखापर्यंत रक्कम ठेवता येते. तीन महिन्यांतून व्याज घेता येते.  1 लाखासाठी तीन महिन्यांत 2 हजार 75 रुपये व्याज मिळते. 8.3 टक्के व्याज मिळते. ही योजना सुरक्षा दलातून निवृत्त झालेल्यांसाठी 50 वर्षे व सामान्य नागरिकांसाठी 60 वर्षे वयाची अट लागू होते. 60 वर्षे आणि त्यापुढील नागरिकांना सिनीयर सिटीजन खाते उघडता येते. 

सुकन्या समृद्धी योजना (21 वर्षे) ः  दहा वर्षापेक्षा कमी वय असलेल्या मुलींसाठी ही योजना आहे. एका महिन्याला 1 हजार रुपये भरून घेतले जातात. 15 वर्षानंतर 1 लाख 80 हजार रुपये रक्कम जमा होतात.  व्याजासह सुमारे 5 लाख 26 हजार 991 रुपये मिळतात. 8.1 टक्के व्याज मिळते. सदरची रक्कम 21 वर्षानंतर मिळते. 15 वर्षे प्रत्येक महिन्याला पैसे भरणे भरणे बंधनकारक आहे. 1 हजारपासून सुरुवात करू शकता. 15 वर्षे पैसे जमा करणे गरजेचे आहे. सदर मुलीच्या 21 व्या वर्षी रक्कम मिळते. गरज भासल्यास 10 वी नंतर उच्च शिक्षणासाठी 50 टक्के रक्कम काढता येते. प्राप्तीकरमध्ये सेक्शन 80 उ द्वारे सूट  मिळते.

पीपीएफ (15 वर्षे) ः या खात्यात 500 रुपयांपासून सुरुवात करू शकता. एका आर्थिक वर्षात 1 लाख 50 हजारपर्यंत रक्कम भरु शकता. 1 हजार रुपये प्रत्येक महिन्याला 15 वर्षापर्यंत भरले तर रक्कम 1 लाख 80 हजार रुपये होते. मिळणारी रक्कम सुमारे 3 लाख 28 हजार 862 रुपये होते. 7.6 टक्के व्याजदर आहे. इनकमटॅक्समध्ये सूट मिळते. 

किसान विकास पात्रा (118 महिने) ः या खात्यात दाम दुप्पट रकमेसाठी पैसे गुंतविता येतात. याचा कालावधी 9 वर्षे 10 महिने आहे. 1 हजार पासून सुरुवात करून कितीही रक्कम गुंतविता येते. पैसे एकदाच गुंतविता येतात. 1 लाख गुंतविल्यानंतर कालावधी संपला की 2 लाख रुपये मिळतात. 7.3 टक्के व्याज दिले जाते. 

नॅशनल सेव्हिग सर्टिफिकेट (5 वर्षे) ः यामध्ये 100 रुपयांपासून खाते उघडू शकता. रक्कम भरण्याला मर्यादा नाही. 10 हजार रक्कम भरल्यानंतर कालावधी संपल्यानंतर 14 हजार 185 रुपये मिळणार. 

सार्वजनिकांच्या हितासाठी पोस्ट खात्यातर्फे अनेक योजना राबविण्यात येतात. सर्वसामान्यांनी त्याचा लाभ घेतला पाहिजे. बचत खाते, सुकन्या समृद्धी, सिनिअर सिटीजन, विकास विकास पात्रा आदी योजनांचा लाभ घ्यावा. यासाठी प्रत्येकाने योजनेचा लाभ घेणे गरजेचे आहे.  -पी. एस. कलपत्री, सहाय्यक पोस्ट मास्टर.