Thu, Jul 18, 2019 12:16होमपेज › Belgaon › शूज-सॉक्स खरेदीत अधिकार्‍यांचा हस्तक्षेप

शूज-सॉक्स खरेदीत अधिकार्‍यांचा हस्तक्षेप

Published On: Jul 12 2018 1:40AM | Last Updated: Jul 11 2018 11:52PMबेळगाव : प्रतिनिधी

बेळगाव शैक्षणिक जिल्ह्यातील विद्यार्थ्यांना शूज व सॉक्स खरेदीसाठी एसडीएमसीच्या खात्यावर निधी जमा झाला  आहे. मात्र सदर निधीमध्ये बीआरसी व अधिकार्‍यांचा हस्पक्षेप होत आहे. उत्तम दर्जाचे साहित्य खरेदीसाठी एसडीएमसीला अधिकार दिला आहे. मात्र यामध्ये अधिकारी नाक खूपसत आहेत.शैक्षणिक वर्षाला सुरुवात होऊन 1 महिना उलटला आहे. विद्यार्थ्यांना शूज व सॉक्स खरेदी सुरू झाली आहे. अधिकारी कंपनीशी संपर्क करून तेथे खरेदी करा, असे सांगत आहेत.   2017-18 ला बेळगाव व चिकोडी शैक्षणिक जिल्ह्यात शूज आणि सॉक्स खरेदीत मोठा भ्रष्टाचार झाला होता.  विद्यार्थ्यांना   कमी  दर्जाचे  साहित्य खरेदी करून देण्यात आले होते. 

विद्यार्थ्यांना 1 जोड शूज व 2 दोन सॉक्सचे जोड देण्यात येणार आहेत. शाळा सुधारणा समितीच्या खात्यावर निधी जमा करणार आला आहे. पहिली ते पाचवीच्या विद्यार्थ्यांना 225 रुपये प्रमाणे साहित्य खरेदी करावे लागणार आहे.  सहावी ते आठवी विद्यार्थ्यांसाठी 250 रुपये आणि नववी ते दहावीच्या विद्यार्थ्यांना 275 रुपये शूज आणि सॉक्ससाठी जमा झाले आहेत.  सरकारने थेट एसडीएमसी व मुख्याध्यापकांच्या खात्यावर विद्यार्थ्यांच्या संख्येनुसार निधी जमा केला आहे. पंधरा ऑगस्टला विद्यार्थ्यांनी नवीन गणवेश व शूज व सॉक्स मिळावेत. त्यासाठी निधी जमा केला आहे.  

दोन महिन्यातच शूज खराब 

2017-18 च्या शैक्षणिक वर्षात ठरावीक शाळांतून एसडीएमसीने उत्तम दर्जाचे साहित्य खरेदी केले होते. मात्र अन्य शाळांतून शूज दोन महिन्यातच खराब झाले होते. त्यावेळी जिल्हा पंचायत सदस्य बैठकीत खराब शूज अधिकार्‍यांच्या निर्दशनास आणून दिले होते. सदर प्रकरणाची चौकशी करावी, असा आदेश देण्यात आला होता. यंदाही तोच कित्ता गिरविणार का, असा सवाल पालकांतून होत आहे.