Thu, Jan 17, 2019 00:40होमपेज › Belgaon › बेळगावात आंतरराष्ट्रीय क्रिकेट सामने

बेळगावात आंतरराष्ट्रीय क्रिकेट सामने

Published On: | Last Updated:

बुकमार्क करा

बेळगाव : प्रतिनिधी 

भारत आणि बांगलादेश महिलांच्या ‘अ’ संघादरम्यान होणार्‍या तीन टी-20 लढतींच्या  मालिकेचे  यजमानपद बेळगावला मिळाले आहेत. 12 ते 16 डिसेंबरदरम्यान केएससीए मैदानावर होणार्‍या लढती क्रिकेट रसिकांना पर्वणीच आहे. 

बेळगावच्या केएससीए मैदानावर होणार्‍या सामन्यांचीमागील वर्षी बेळगावात दोन रणजी सामने पार पडले. याच मैदानात 19 वर्षा खालील महिला कोचिंगं कॅम्प  बेळगावात घेण्यात आले. त्याचप्रमाणे इंटर झोनल सामने भरविण्यात आले. त्याची योग्य दखल घेऊन बीसीसीआयने बेळगावात 3  टी-20 सामने आयोजन करण्यासाठी निर्णय दिला. भारत अ व बांगला देश अ महिला यांच्यात 3 एकदिवशी व 3 टी-20 सामने  खेळविण्यात येणार आहेत.

भारतीय संघाचे नेतृत्व अनुजा पाटीलकडे

बेळगाव : प्रतिनिधी 

एकदिवशीय सामने  हुबळीच्या  केएससीए  मैदानावर 2, 5, व 7  डिसेंबर दरम्यान भरविण्यात येणार  आहेत. तर 8 डिसेंबर रोजी दोन्ही संघांचे बेळगावात आगमन होणार आहे. भारतीय संघाचे नेतृत्व कोल्हापुरची अनुजा पाटील करणार आहे. महाराष्ट्रतील जास्तीत जास्त महिला क्रिकेटपट्टु भारतीय संघात आहेत. त्याच प्रमाणे यावर्षी  झालेल्या महिला विश्‍व क्रिकेट स्पर्धेत भारतीय संघाने अंतिम फेरीत मजल मारून उपविजेतेपद पटकाविले होते. महिला क्रिकेट गावोगावी, गल्लो गल्लीत पोहचावे म्हणुन बीसीसीआयने हा निर्णय घेतला आहे. त्यासाठी महिलांचे सामने सर्वत्र आयोजन करण्याचे प्रयत्न सुरू केले आहेत. बेळगावात आंतरराष्ट्रीय सामना भरविण्यात येणार असल्याने या मैदानाला आंरराष्ट्रीय दर्जा मिळाला आहे. 

बेळगावच्या केएससीए क्रिकेट स्टेडीयमवर आंतरराष्ट्रीय  सामने भरविले जावे यासाठी धारवाड विभागीय क्रिकेटसंघटनेचे सभासद अविनाश पोतदार व मैदान व्यस्थापक दिपक पवार यांनी विशेष प्रयत्न केले आहेत.