Thu, Apr 25, 2019 16:20होमपेज › Belgaon › कुसमळी पुलाची अधिकार्‍यांकडून पाहणी

कुसमळी पुलाची अधिकार्‍यांकडून पाहणी

Published On: Jul 27 2018 1:24AM | Last Updated: Jul 27 2018 1:24AMजांबोटी: वार्ताहर

चोर्ला मार्गावर मलप्रभा नदीवरील कुसमळी पुलाची पाहणी अखेर सार्वजनिक बांधकाम खात्याच्या अधिकार्‍यांनी केली. तसेच खड्डे बुजवून डांबरीकरण करण्याचा निर्णय घेतला. 

पावसामुळे पुलावर खड्डे पडून तळी साचली होती. त्यामुळे पुलाला धोका असल्याचे वृत्त ‘पुढारी’ने मंगळवारठ  प्रसिध्द करताच याची दखल घेत सार्व.बांधकाम खात्याचे तालुका अधिकारी पी. जी. देसाई व जांबोटी विभाग अंभियंते विनायक यांनी पुलाची पाहणी केली.सदर पुलावर पुन्हा डांबर टाकण्यात येणार असल्याची माहीती अभियंते विनायक यांनी दिली.

पुलावरुन अवजड वाहतूक होत असल्याने जास्त धोका आहे. त्यामुळे बांधकाम खाते व पोलिसांनी सतर्कता राखण्याची गरज असल्याचे देसाई यांनी यावेळी स्पष्ट केले. दोन महिन्यांपूर्वीच वीस टनाहून अधिक वजनदार वाहनांवर बंदी घालण्यात आली आहे. मात्र,त्याचे वाहनधारकांकडून पालन होताना दिसत नाही.