Mon, Nov 19, 2018 23:13होमपेज › Belgaon › मतदानासाठी यंदा मार्करऐवजी शाई

मतदानासाठी यंदा मार्करऐवजी शाई

Published On: Mar 05 2018 1:41AM | Last Updated: Mar 04 2018 11:33PMम्हैसूर : प्रतिनिधी       

राज्यात विधानसभा निवडणुकीच्या तयारीला वेग आला आहे. मतदानासाठी शाईचा वापर कशाप्रकारे करावा, याबद्दल सध्या निवडणूक आयोगाने चर्चा चालविली आहे. मतदान केल्यानंतर मतदाराच्या बोटाला मार्कर पेनने खूण न करता काळ्या रंगाची दाट शाई लावण्याचे निश्‍चित करण्यात आले आहे.

राज्य सरकारची म्हैसूर पेन्ट अँड वार्निश कंपनी यंदाच्या विधानसभा निवडणुकीसाठी शाई पुरविणार आहे. गेल्या 6? 7 महिन्यापासून निवडणूक आयोगाने शाईऐवजी मार्कर पेन वापरण्याला पसंती दर्शविली होती. मात्र  काही महिन्यांपूर्वी झालेल्या राज्य सहकारी संघाच्या निवडणुकीत 794  मार्कर पेनचा शाई म्हणून उपयोग करण्यात आला होता. 

त्याचबरोबर 2017 मध्ये झालेल्या राष्ट्रपती निवडणुकीत एक हजार मार्कर पेनचा वापर करण्यात आला होता.  निवडणूक कर्मचार्‍यांना  मार्कर पेन वापरणे सुलभ होते. मात्र याला निवडणूक आयोगाने यंदा फारशी आसक्ती दाखविली नसल्याचे दिसून येत आहे.यंदाच्या निवडणूकीसाठी 10 मिलीच्या 1 लाख 32 हजार शाई बाटल्यांची मागणी राज्य निवडणूक आयोगाने केली असून त्यानुसार शाई उत्पादनाचे कार्य सुरू आहे.ही शाई सहा महिने टिकते.