Sun, Aug 25, 2019 12:28होमपेज › Belgaon › आज किल्ला तलावाशेजारी तिरंगा फडकणार

आज किल्ला तलावाशेजारी तिरंगा फडकणार

Published On: Aug 15 2018 2:05AM | Last Updated: Aug 14 2018 8:43PMबेळगाव : प्रतिनिधी

किल्ला तलावाशेजारी सर्वात देशातील सर्वांत उंंचीवरील तिरंगा ध्वज फडकविण्याचा मान बेळगावला मिळाला असला तरी, तो सातत्याने फडकविण्यात अनंत अडचणींचा सामना करावा लागत आहे. आतापयर्र्र्र्र्त तिरंगा फडकविताना, वारा, पाऊस, उंची यामुळे ध्वज फाटला आहे. दोन दिवसापूर्वी ध्वजाची लांबी, रुंदी व वजनात कपात करुन तिरंगा फडकविण्यात आला. मात्र कांही तासातच तो पुन्हा खाली उतरावा लागला. 15 ऑगस्ट रोजी पुन्हा मनपा तिरंगा ध्वज फडकविण्याची तयारी करीत आहे. 

बेळगावात 35 मीटर उंचीवर असलेल्या खांबावर तिरंगा फडकविण्यासाठी तो किती लांबी रुंदीचा असावा म्हणजे तो कायम फडकत राहील याचा अभ्यास करीत आहेत. यापूर्वी तिरंग्याची उंची  110 मीटर, वजन-36 टन, लांबी-120 फूट, रुंदी 80 फूट, जाडी 12 मिमी होती. आकारमान- 9600 चौ.फू. होते. हा ध्वज फाटू नये म्हणून पॉलिस्टर कापडापासून बनवला गेला होता. दोन दिवसांपूर्वी फडकविण्यात आलेल्या तिरंग्याचे वजन 85 किलो होते. आकार  72  बाय  48 फूट असा होता. तो प्रायोगिक तत्वावर फडकविण्यात आला. मात्र ध्वजस्तंभाची उंची 35 मीटर असल्याने वारा, पावसामुळे हा तिरंगा पुन्हा उतरविण्यात आला. उद्या 15 ऑगस्टरोजी तो पुन्हा फडकविण्यात येणार आहे. 

बजाज कंपनीला या कामाचा ठेका देण्यात आला आहे. राष्ट्रध्वजासाठी होणारा खर्च महापालिकेच्या निधीतून करण्यास लेखा स्थायी समितीने विरोध केला होता. तसा ठरावदेखील दोन वेळा मनपामध्ये करण्यात आला. त्यामुळे राष्ट्रध्वजाचा आकार कमी करुन तो फडकविण्यात यावा, अशी मागणी जोर धरु लागली. त्याप्रमाणे मनपाकामाला लागली आहे. 
मोठा गाजावाजा करून तब्बल 1 कोटी 62 लाख रुपयांचा निधी खर्च करून चार महिन्यांपूर्वी येथील बुडा कार्यालयासमोर देशातील सर्वात उंच तिरंगा ध्वज दिमाखात फडकाविण्याचा मान मिळविला. मात्र काही दिवसांतच हा ध्वज फडकविण्यात अडथळे निर्माण येऊ लागले. आता तरी राष्ट्रध्वज स्वातंत्र्यदिनाचे औचित्य साधून फडकविल्यानंतर तो कायम फडकलेल्या अवस्थेत राहील काय याकडे बेळगावकरांचे लक्ष लागून राहिले आहे.