Tue, Dec 10, 2019 14:14होमपेज › Belgaon › भारतीय लष्कराचे युद्ध कौशल्य अव्वल

भारतीय लष्कराचे युद्ध कौशल्य अव्वल

Published On: Dec 29 2017 1:35AM | Last Updated: Dec 29 2017 12:12AM

बुकमार्क करा
बेळगाव : प्रतिनिधी 

भारतीय लष्कराचे युद्ध कौशल्य अव्वल दर्जाचे असून, त्याचा लाभ आपल्या सेनेला झाला आहे. त्यांची हत्यारे वापरण्याची संधी आमच्या देशाच्या सैनिकांना मिळाली. ही अभिमानास्पद गोष्ट आहे. समुद्र चाचे आणि दहशतवाद्यांशी लढताना या प्रशिक्षणाचा नक्‍कीच उपयोग होईल. भारतीय लष्करातील गोरखा बटालियन बरोबर प्रशिक्षण करण्याची संधी मिळाली. त्यांची युद्ध कौशल्य आमच्या सैन्याला अनुभवता आली, असे अनुभव मालदिव राष्ट्रीय सुरक्षा बलाचे वरिष्ठ निरीक्षक ब्रिगेडियर जनरल अली जुहेर यांनी सांगितले. 

मराठा रेजिमेंटच्या छत्रपती शिवाजी स्टेडियमवर गुरुवारी सायंकाळी आयोजित करण्यात आलेल्या भारत-मालदिव संयुक्‍त सैन्य प्रशिक्षण अभ्यासाच्या सांगता समारंभात प्रमुख पाहुणे म्हणून ते बोलत होते.