होमपेज › Belgaon › संघटित समाजामधूनच होईल बलशाली भारत 

संघटित समाजामधूनच होईल बलशाली भारत 

Published On: Feb 26 2018 1:15AM | Last Updated: Feb 26 2018 12:02AMबेळगाव ः प्रतिनिधी

विविध समस्यांच्या उच्चाटनासाठी आणि बलशाली भारतासाठी संघटित समाजशक्‍ती आवश्यक आहे. विषमता, भेदभाव याला मूठमाठी देण्यासाठी समाजाने एकवटले पाहिजे, असे आवाहन विश्‍व हिंदू परिषदचे अ. भा. कार्यकारिणी सदस्य धर्मनारायण शर्मा (दिल्ली) यांनी केले.

विश्‍व हिंदू परिषद धर्मजागरण जिल्हा शाखेच्या वतीने कॉलेज रोडवरील लिंगराज महाविद्यालयाच्या मैदानावर रविवारी विराट हिंदू सभा झाली. त्यावेळी ते बोलत होते. अध्यक्षस्थानी चित्रदुर्ग येथील बसवमूर्ती मादार चन्‍नय्या स्वामी होते. व्यासपीठावर नागनूर रुद्राक्षी मठाचे डॉ. सिद्धराम स्वामी, यड्डूर श्रीशैल महापीठाचे डॉ. चन्‍नसिद्दराम पंडिताराध्य शिवाचार्य, कणेरी मठ कोल्हापूर येथील अद‍ृष्य काडसिद्धेश्‍वर स्वामी, बेळगावचे चित्प्रकाशानंद  आदी 150 पेक्षा अधिक स्वामी उपस्थित होते.  

शर्मा म्हणाले, अयोध्या मंदिर प्रश्‍न सर्वोच्च न्यायालयात आहे. राम मंदिर उभारण्याची सिद्धता हिंदू समाजाने केली आहे. लवकरच राममंदिर होईल. तेव्हा भारतात हिंदू राष्ट्रस्थापना होईल. देशाला बेरोजगारी, नक्षलवाद आदी समस्यांनी ग्रासले आहे. यासाठी विशाल भारत, सुखी भारत निर्माण करण्यात येत आहेत. 

भारताने जगात दबदबा निर्माण केला आहे. देशातील सर्व प्रकारच्या समस्यांचे निराकरण करण्यासाठी शक्‍तिशाली समाज हवा. दुर्बल बनू नका. येणार्‍या संकटांचा धैर्याने सामना करा.