Sun, Sep 23, 2018 09:58होमपेज › Belgaon › वेतनवाढ, स्वतंत्र ध्वजावर मंत्रिमंडळ चर्चा लांबणीवर

वेतनवाढ, स्वतंत्र ध्वजावर मंत्रिमंडळ चर्चा लांबणीवर

Published On: Feb 28 2018 1:17AM | Last Updated: Feb 28 2018 1:12AMबंगळूर : प्रतिनिधी    

सरकारी कर्मचार्‍यांची वेतनवाढ आणि राज्याचा स्वतंत्र ध्वज निश्‍चित करण्यासंबंधीची मंत्रिमंडळ चर्चा आज मंगळवारी लांबणीवर पडली. राज्य सरकारी कर्मचार्‍यांना 30 टक्के वेतनवाढ देण्यात येईल, असे मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांनी अर्थसंकल्पीय अधिवेशन काळात जाहीर केले. मंत्रिमंडळात चर्चा होऊन निर्णय होणे बाकी आहे. लाल?पिवळा हा राज्याचा ध्वज असल्याचे यापूर्वीच्या सरकारांनी जाहीर केल्यानंतर या ध्वजाचा वापर राज्योत्सव व कन्‍नडिगांच्या अन्य काही सार्वजनिक कार्यक्रमांतून होऊ लागला. मात्र, लाल?पांढरा? पिवळा अशा त्रिवर्णात राज्याचा ध्वज असावा, असे सुचविले गेले.  त्यानंतर नेमण्यात आलेल्या ध्वज कमिटीकडे पाठपुरावा करण्यात आला  होता. ध्वज कमिटीनेही याला मान्यता दर्शवून सरकारला अहवाल पाठविला आहे. मंत्रिमंडळात या अहवालावर आज होणारी चर्चा लांबणीवर पडली.