Thu, May 23, 2019 20:58
    ब्रेकिंग    होमपेज › Belgaon › स्वतंत्र उत्तर कर्नाटक मुद्दा फक्‍त प्रसिद्धीसाठी : बी.आर.संगाप्पगोळ

स्वतंत्र उत्तर कर्नाटक मुद्दा फक्‍त प्रसिद्धीसाठी : बी.आर.संगाप्पगोळ

Published On: Jul 31 2018 1:29AM | Last Updated: Jul 30 2018 8:56PMचिकोडी : प्रतिनिधी 

उत्तर कर्नाटकाच्या  विकासासाठी आवश्यक योजनांसाठी  सर्वपक्षीय नेत्यांनी, मठाधीशांनी एकत्रितपणे मुख्यमंत्र्यांची भेट घेउन दबाव घालण्याची गरज आहे. न झाल्यास सामूहिक राजीनामा देवून विरोध करावा. पण कांहीजण प्रसिध्दीसाठी उत्तर कर्नाटक स्वतंत्र राज्याचा मुद्दा उचलून धरत असल्याचा आरोप ज्येष्ठ नेते बी.आर.संगाप्पगोळ यांनी केला आहे.

सरकारी विश्रामगृहात आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. उत्तर कर्नाटकावर अन्याय होतच असून केवळ मुख्यमंत्री कुमारस्वामींवर आरोप करणे चुकीचे आहे. त्यांनी बेळगांव येथे सुवर्णसौध, देवेगौडा यांनी कृष्णा खोर्‍याला भरीव निधी मंजूर केला आहे. पण अद्यापही जुने म्हैसूर व उत्तर कर्नाटकाच्या विकासात तफावत दिसून येत असून उत्तर कर्नाटकासोबत दुजाभाव केल्याचे स्पष्ट होते.

उत्तर कर्नाटकातील जगदीश शेट्टर, उमेश कत्ती, नडहळ्ळी यांच्यासह अनेक दिगज नेत्यांनी राज्याचे नेतृत्व केले. त्यांच्याकडून उत्तर कर्नाटकाचा विकास का झाला नाही, असा सवाल केला आहे.

या भागात पीडब्ल्यूडी, शिक्षणासह इतर खात्यांमधील एमडी, मुख्य अभियंतासह वरिष्ठ अधिकार्‍यांचे उत्तर विभाग कार्यालये सुरु करावीत. तसेच रोजगारासाठी मुबंई-बंगळूर कॉरिडॉर स्थापन करावा. 20 वैद्यकीय व अभियांत्रिकी महाविद्यालये 20 मंजूर करण्यासह सर्व पाणी योजना राबविण्याची गरज आहे, अशी मागणी संगाप्पगोळ यांनी केली. यावेळी सुरेश ब्याकूडे उपस्थित होते.