होमपेज › Belgaon › अण्णा हजारे यांच्या सभेला वाढता पाठिंबा

अण्णा हजारे यांच्या सभेला वाढता पाठिंबा

Published On: Jan 03 2018 1:10AM | Last Updated: Jan 03 2018 12:39AM

बुकमार्क करा
बेळगाव : प्रतिनिधी

भ्रष्टाचार विरोधी आंदोलनाचे प्रणेते अण्णा हजारे यांच्या नियोजित सभेसाठी जोरात तयारी करण्यात येत असून त्याला चांगला प्रतिसाद लाभत आहे. सदर सभा 5 जानेवारी रोजी व्हॅक्सीन डेपोवर पार पडणार आहे. दरम्यान याचदिवशी प्यास संघटनेने उभारलेल्या अरळीकट्टी गावातील तलावाचे उद्घाटन अण्णा हजारे यांच्या हस्ते करण्यात येणार आहे.

पिकांना आधारभूत किमत मिळावी, लोकपाल व लोकायुक्त नियुक्त करावेत, निवडणूक प्रक्रियेत सुधारणा कराव्या आदी मागण्या घेऊन अण्णा हजारे हे देशव्यापी आंदोलन छेडणार आहेत. त्यासाठी जागृती सभा बेळगावात होणार आहे. यासाठी बेळगाव परिसरातून व्यापक पाठिंबा व्यक्त करण्यात येत आहे.

सदर सभेला गुरुदत्त मित्रमंडळ केळकर बाग, बांधकाम कामगार संघटना, टी. पावडर सेलर असोसिएशन, माऊली महिला मंडळ केळकर बाग, सिनिअर सिटीझन असो., वाल्मिकी समाज, सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ केळकर बाग, मराठी युवा मंच, एल्गार सामाजिक साहित्य परिषद, शेतकरी बचाओ संघटना, लक्ष्मीनगर युवक मंडळ, बेरड रामोशी संघटना, व्हिलेज वजुद, माजी सैनिक संघटना, बाबासाहेब आंबेडकर युवा मंच, जायंटस मेन बेळगाव, शहर म. ए. समिती (टी. के. पाटील गट), भ्रष्टाचार निर्मूलन समिती, स्वराज्य संघटना, जय शिवराय युवक मंडळ कणबर्गी, मोटार कामगार संघटना, बालवीर सोशल फांउडेशन, नवहिंद परिवार, मित्रप्रेम युवक मंडळ गांधीनगर, राजमुद्रा सोसायटी परिवार, खानापूर रहिवासी संघटना, गुंजी सोशिएल फांऊडेशन, फुले युवक मंडळ, हल्याळ, कालिकादेवी युवक मंडळ हल्याळ, स्वराज्य महिला मंडळ रामदेव गल्ली इत्यादी संघटनांनी पाठिंबा दर्शविला असल्याची संयोजकांनी दिली आहे.

त्याचबरोबर माचीगड येथील साहित्य संमेलनाच्या दरम्यान सभेबाबत नागरिकांना माहिती देण्यात आली. यावेळी बलराम परमोजी, राकेश वासुदेव, भरमा कोलेकर, सूरज कणबरकर आदींनी सभेबाबत जागृती केली.

अरळीकट्टी तलाव उद्घाटन 

प्यास या सामाजिक संघटनेतर्फे अरळीकट्टी गावात उभारण्यात आलेल्या तलावाचे उद्घाटन 5 रोजी अण्णा हजारे यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात येणार आहे. यावेळी जिल्हाधिकारी एस. झियाउल्ला जि. पं. मुख्य कार्यकारी अधिकारी आर. रामचंद्रन, निवासी जिल्हाधिकारी डॉ. सुरेशकुमार इटनाळ, नांगनूर रुद्राक्ष मठाचे डॉ सिद्राम स्वामी उपस्थित राहणार आहेत.