Mon, Jul 15, 2019 23:45होमपेज › Belgaon › शहरात भिकार्‍यांची संख्या वाढतेय

शहरात भिकार्‍यांची संख्या वाढतेय

Published On: Jan 12 2018 1:51AM | Last Updated: Jan 11 2018 8:16PM

बुकमार्क करा
बेळगाव : प्रतिनिधी

शहरात सध्या कोणत्याही परिसरात किंवा सिग्नलवर फेरी मारली तरी चाळीशी ओलांडलेले धडधाकट असलेले पुरुष व महिला भीक मागताना दिसतात. शहरात भिकार्‍यांच्या प्रमाणातदेखील हळूहळू वाढ होत चालली आहे. याकडे मनपाने लक्ष देण्याची गरज निर्माण झाली आहे. 

शहरातील बहुतांश सिग्नल व रस्त्याच्या बाजूला भिकारी दिसत आहेत. मंदिर, चर्च, मशीदच्याबाहेर आसरा शोधून भीक मागणार्‍यांचे प्रमाण वाढले आहे. भीक मागणार्‍यांमध्ये अधिक जण वृद्ध, चिमुकले आहेत. घरातीलच मंडळींना ज्येष्ठ नकोसे झाले आहेत. आई-वडिलांच्या प्रॉपर्टीसाठी, तर काहीजण घरात अडगळ झाली म्हणून आई- वडिलांना घराबाहेर काढलेल्यांवर रस्त्यावरचे जगणे आले आहे. 

तंत्रज्ञान आलं,  विज्ञानाने प्रगती केली. मात्र घरातील वस्तू अडगळ होते तशाप्रकारे घरातील ज्येष्ठ मंडळीही आपसूकच रस्त्यावर आली. पोटच्या लेकराकडून व सुनेकडून घृणास्पद वागणूक मिळू लागण्याने त्यांनी रस्त्यावरचे जीवन पत्करले आहे. 

शहरात अनेक ठिकाणी भीक मागणार्‍यांची संख्या वाढतीच आहे.  यामुळे शहरातील सामाजिक संस्था नेमक्या काय करत आहेत, असा प्रश्‍न स्थानिक परिसरातील नागरिक करीत आहेत. ज्या ठिकाणी ज्येष्ठ मंडळी भिक्षा मागण्यासाठी बसलेली असतात. त्या ठिकाणाहून हजारो गाड्या रस्त्याच्या कडेने ये-जा करतात. मात्र, संवेदना हरविल्याप्रमाणे कोणीही विचारपूस करत नाही.   

मनपाने लक्ष देण्याची गरज

महापालिका ‘कर’ वसूल करताना त्यांच्याकडून ‘भिकारी कर’ वसूल केला जातो. मात्र, भिकार्‍यांसाठी कोणत्याच उपाययोजना केल्या जात नाहीत. यासाठी मनपाने लक्ष देऊन उपाययोजना राबविण्याची गरज आहे.