होमपेज › Belgaon › दुधामध्ये भेसळ प्रमाणात वाढ

दुधामध्ये भेसळ प्रमाणात वाढ

Published On: Jul 28 2018 1:32AM | Last Updated: Jul 27 2018 7:57PMअकोळ : वार्ताहर

गेल्या 60-70 वर्षापूर्वी गायी-म्हैशीचे दूध घरीच वापरत असत. दूध डेअरी नसल्याने दुभत्या जनावरांचे पौष्टिक दूध घरीच वापरण्यात येत असे. सध्या दूग्ध व्यवसाय वाढीस लागल्यापासून दुधामध्ये भेसळीचे प्रमाण वाढले आहे.

यापूर्वी जनावरांना मक्याची कणसे, भाताचा कोंडा, भोपळे फोडून घालणे, गहू-ज्वारीच्या कण्या, बाजरी, कडबा, चांगले गवत असे खाद्य दिले जात होते. यामुळे दुधाच्या फॅटचे प्रमाणही अधिक होते. घरोघरी दही, ताक, लोणी असायचे. त्यामुळे घरातील नागरिक व मुलांचे आरोग्य सदृढ होते. आता भेसळयुक्‍त दुधामुळे पौष्टिकपणा नाहीसा झाला आहे.सध्या दूध विकत घेण्याची वेळ आली असून अनेकजण दुग्ध व्यवसायात मलई खाण्यात गुंतले आहेत. दुग्धजन्य पदार्थांतही भेसळ वाढली आहे.

बीएसएनएल टॉवर बंद

चार दिवसापासून अकोळ येथील बीएसएनएल मोबाईल टॉवर बंद पडला आहे. त्यामुळे बीएसएनएल मोबाईल धारकांची अडचण झाली आहे.अकोळसह परिसरात अनेक बीएसएनएल मोबाईलधारक आहेत. दैनंदिन जीवनात मोबाईलवरुन अनेक कामे होत असतात. संबंधितांनी तात्काळ टॉवरवरील बिघाडाची दुरुस्ती करण्याची मागणी होत आहे.

इंटरनेट सेवा बंद

सिदनाळ पुलावर पूर आल्यानंतर ओएफसी केबल तुटून पडली आहे. यामुळे परिसरातील इंटरनेट सेवा बंद झाली आहे.सदर पुलावरुन अनेकजण गुडघाभर पाण्यातून ये-जा करण्याचे धाडस करतात. पण केबल तुटून पडल्याने दुचाकीस्वार अडकून पडल्याची घटना घडली. नागरिकांनी सतर्कतेने त्याला बाहेर काढले. केबल जोडण्याची मागणी नागरिकांतून होत आहे.