Thu, May 23, 2019 20:33
    ब्रेकिंग    होमपेज › Belgaon › सरकारी कर्मचार्‍यांना जुलैमध्ये वाढीव वेतन

सरकारी कर्मचार्‍यांना जुलैमध्ये वाढीव वेतन

Published On: Jun 24 2018 1:32AM | Last Updated: Jun 23 2018 11:57PMबंगळूर : प्रतिनिधी

राज्य सरकारी कर्मचार्‍यांना 1 जुलैपासून वाढीव वेतन आणि महागाई भत्ता मिळणार आहे. मागील सरकारच्या काळात तत्कालीन मुख्यमंत्री सिद्धरामय्यांनी सहाव्या वेतन आयोगाच्या शिफारसी लागू केल्या होत्या. त्यानुसार 30 टक्के वेतनवाढ कर्मचार्‍यांना जाहीर झाली होती.

गत एप्रिलपासून वाढीव वेतन आणि तेरा टक्के महागाई भत्ता कर्मचार्‍यांना मिळणार आहे. ही रक्‍कम रोख स्वरूपातच दिली जाणार आहे. बदलत्या परिस्थितीनुसार 43 टक्के महागाई भत्ता आणि 30 टक्के वेतनवाढ द्यावी लागणार आहे. सहावा वेतन आयोग लागू करण्यासाठी त्याकरिता 10,500 कोटींचा खर्च येणार आहे. गत अर्थसंकल्पात वेतनवाढ जाहीर करूनही ती जमा करण्यात आली नसल्याबद्दल कर्मचार्‍यांकडून सरकारकडे विचारणा करण्यात येत होती.

त्यामुळे युती सरकारने अर्थ खात्याची परवानगी घेऊन याबाबतची घोषणा केली आहे. त्यानुसार एप्रिल, मे आणि जून महिन्यातील वाढीव वेतनाची रक्‍कम एकाचवेळी जुलै महिन्यात जमा होणार आहे.