Thu, Mar 21, 2019 15:55होमपेज › Belgaon › सोशल मीडियाद्वारे हनीट्रॅपमध्ये वाढ

सोशल मीडियाद्वारे हनीट्रॅपमध्ये वाढ

Published On: Aug 14 2018 1:08AM | Last Updated: Aug 13 2018 11:42PMबेळगाव : प्रतिनिधी

खून, दरोडे, चोरी, लूट अशा प्रकरणांमध्ये दिवसेंदिवस वाढ होत असताना बेळगावसह बंगळूर दावणगेरी धारवाड चित्रदुर्ग, हावेरी, बळ्ळारी, मंगळूर, म्हैसूर या जिल्ह्यांमध्ये ऑनलाईन हनीट्रॅपचे प्रकार वाढीस लागले असल्याचे पोलिसांच्या तपासातून पुढे आहे. गेल्या 12 महिन्यांच्या कालावधीत 390 प्रकरणांची नोंद झाली आहे. 

राज्यामध्ये हनीट्रॅपमुळे अनेकांची फसगत होत आहे. यामध्ये पैशाची मोठ्या प्रमाणात लूट होत आहे. प्रेमाचे नाटक करून ब्लॅकमेल करण्याचा धंदा थाटण्यात आला आहे. राज्यभरात अशा प्रकरणांची वाढ झाली असून सोशल मीडियाच्या माध्यमातून अशी प्रकरणे घडत असल्याचे समोर आले आहे. फेसबुक, व्हॉट्सअप याद्वारे ही प्रकरणे घडत आहेत. ऑनलाईनवर पैसे हडप करण्याचे प्रकार सुरु असताना दुसरीकडे ऑनलाईनच्या माध्यमातून वेश्याव्यवसाय चालविण्यात येत आहे. ब्लॅकमेल करून हनीट्रॅपच्या माध्यमातून पैसा वसूल करण्याचा धंदा अनेकांनी थाटला आहे. सोशल मीडियाच्या माध्यमातून परिचय करून घेऊन लूट केल्याच्या प्रकरणांत वाढ झाली आहे. राज्यात एप्रिल 2017 ते एप्रिल 2018 पर्यंत 390 हनीट्रॅप प्रकरणांची नोंद पोलिस स्थानकांमध्ये झाली आहे. काही प्रकरणे पोलिस स्थानकात दाखलही झाली नाहीत. अनेकजण अपमानाला घाबरून पोलिसस्थानकात तक्रार देण्यात पुढे येत नसल्याचे समोर आले आहे.  

सोशल मीडियावरून ओळख झाल्यानंतर घरी बोलावून एकांतवासात घालवलेल्या क्षणांचे चित्रीकरण करून ते सोशल मीडियावर व्हायरल करण्याची धमकी देण्याचे प्रकार सुरु आहेत. 

ऑनलाईन वेश्याव्यवसाय

राज्यामध्ये ऑनलाईन वेश्याव्यवसायाचे प्रकार वाढीस लागला आहे. पश्‍चिम बंगाल, उत्तर प्रदेश बिहार, नेपाळ, मध्यप्रदेश तसेच बांगलादेश व नेपाळमधूनही युवतींना संपर्क साधून वेश्याव्यवसाय चालविण्यात येत आहे.