Tue, May 21, 2019 18:38होमपेज › Belgaon › निवडणुकीमुळे ‘करणी’ला ऊत

निवडणुकीमुळे ‘करणी’ला ऊत

Published On: May 08 2018 1:55AM | Last Updated: May 07 2018 9:04PMबेळगाव : प्रतिनिधी

निवडणुकीचे वारे वाहू लागल्यनंतर ‘करणी’लाही जोर आला आहे. गावांच्या वेशीवर लिंबू-उतार्‍यांच्या राशी दिसून येत आहेत. 

विधानसभा निवडणुकीच्या रिंगणात राष्ट्रीय पक्षाबरोबर अनेक अपक्ष उमेदवार उतरले आहेत. माझा पक्ष निवडून येणार की तुझा यामध्ये कार्यकर्त्यांमध्ये स्पर्धा चालली आहे. यामुळे ‘करणी’ केली जात असल्याची चर्चा रंगली आहे. 

तालुक्यातील अनेक गावांच्या वेशीवर  लिंबू व उतार्‍याच्या राशी दिसून येेत आहेत. अंधश्रद्धेविषयी जागृती नसल्याने अशा घटनामध्ये वाढ होत आहे.

बेळगाव शहरात अंधश्रद्धा निर्मूलन समितीतर्फे अंधश्रद्धेविरुद्ध जागृती केली जाते. तथापि, तालुक्यात फारसे कार्य नसल्याने या भागातील लोक अंधश्रध्द्ला थारा देतात. निवडणुकीच्यावेळी तरी या प्रकाराला गती मिळाली आहे. 

करणीमध्ये नारळ, लिंबू, लहान बाहूली, काळा दोरा, कुंकू, लाल कपडा, तार मोळे व गुलालाचा वापर करण्यात येतो. अमावस्या आली म्हणजे बेळगाव राकसकोप रस्त्यावरील बोकनूर क्रॉस, बेळगुंदी जवळील ग्लोबल क्रॉस व हायस्कूल तसेच बिजगर्णी येथील इंदिरानगरामध्ये मोठ्या प्रमाणात लिंबू व उतार्‍याच्या राशी दिसून येतात. तसेच पूर्व भागातही अनेक क्रॉसवर अशा राशी दिसून येतात. यावेळी अमावस्या नसली तरी निवडणूक असल्याने लिंबू-कोहळ्याच्या राशी दिसून येत आहेत. 

बुवाबाजी करणारे लोक लहान मुलांपासून मोठ्या लोकांना देखील अंधश्रद्धेकडे खेचतात. शेणाच्या बाहूल्या करणे, लिंबूला टाचण्या टोचणे, गुलालाचा भात करणे, हे अगोदर दररोज केले जात होते. मात्र लोकजागृतीनंतर फक्त अमावस्या व पोर्णिमेला केले जात आहे. उमेदवार निवडून येण्यासाठी बुवा, मांत्रिकाकडे जाऊन करणी केली जाते.

लोकांमध्ये खूप अंधश्रद्धा आणि अज्ञान आहे. करणी, बाधा या सर्व खोट्या गोष्टी आहेत.  अंनिसतर्फे आम्ही  लोकांनी टाकलेले उतारे जाळतो, खाद्यपदार्थ घरी घेऊन जातो. अंधश्रद्धेतून होणारे शोषन रोखले पाहिजे. यात शिकलेले लोक भरडले जात आहेत. तळागाळातील लोकांनी अंधश्रद्धेपासून दूर राहिले पाहिजे. करणी करून निवडणूक जिंकता येत नाही, हे शिकलेल्या उमेदवारांनी तरी समजून घ्यावे.    - आनंद चिठ्ठी, अंधश्रद्धा निर्मूलन समिती कार्यकर्ते.