Sun, Apr 21, 2019 03:50होमपेज › Belgaon › मंत्री महादेवप्पांवर आयकर छापे

मंत्री महादेवप्पांवर आयकर छापे

Published On: Apr 26 2018 1:24AM | Last Updated: Apr 26 2018 12:50AMबंगळूर : प्रतिनिधी

कर्नाटक विधानसभेची निवडणूक 12 मे रोजी होणार आहे. निवडणुकीची प्रक्रिया चाललेली असतानाच आयकर खात्याने राज्याचे बांधकाममंत्री एच. सी. महादेवप्पा यांच्यासह काँग्रेसला पाठिंबा देणार्‍या बड्या कंत्राटदारांच्यावरही छापे टाकले आहेत.

ही कारवाई राजकीय हेतूने प्रेरित असल्याचा आरोप मुख्यमंत्री सिद्धरामय्या व काँग्रेस प्रदेशाध्यक्ष जी. परमेश्‍वर यांनी केली आहे. सहा महिन्यांपासून केंद्र सरकारने केवळ काँग्रेस नेत्यांच्यावर छापे टाकण्याचे सत्र सुरू केल्याचा आरोपही त्यांनी केला आहे. निवडणुकीमध्ये काँग्रेस नेते व त्यांच्या समर्थकांवरही कारवाई करत आयकर खाते अप्रत्यक्षरीत्या भाजपला साहाय्य करीत असल्याचा आरोपही त्यांनी केला.

कारवाई राजकीय उद्देशाने प्रेरित : काँग्रेस

काँग्रेस नेत्यांच्यावर व प्रामुख्याने वीजमंत्री डी. के. शिवकुमार यांच्यावरील कारवाई या राजकीय उद्देशाने प्रेरित असल्याचे काँग्रेसचे म्हटले आहे. अलीकडेच पाटबंधारेमंत्री एम. बी. पाटील यांच्या निवासस्थानावर आयकरने छापे टाकले होते. यावरून केवळ काँग्रेस नेत्यांना केंद्र सरकारने लक्ष्य केल्याचा आरोपही काँग्रेस पक्षाने केला आहे.