होमपेज › Belgaon › नासिर बागवान यांच्यावर प्राप्तिकर विभागाचे छापे

नासिर बागवान यांच्यावर प्राप्तिकर विभागाचे छापे

Published On: Apr 29 2018 2:09AM | Last Updated: Apr 29 2018 12:53AMखानापूर : वार्ताहर

निधमीर्र् जनता दलाचे खानापूर मतदारसंघातील उमेदवार नासीर बागवान यांच्या तीन मालमत्तांवर शनिवारी पहाटे प्राप्तिकर विभागाने एकाच वेळी छापे टाकले. तसेच  बेळगावातही त्यांच्या बँक खात्यांची चौकशी करण्यात आली.

छाप्यांमध्ये बेहिशेबी संपत्ती सापडली का, किती सापडली याचा तपशील मिळू शकलेला नाही. मात्र, या कारवाईने राजकीय वर्तुळात खळबळ माजली आहे.

बागवान हे जिल्ह्यातील सर्वात श्रीमंत उमेदवार आहेत. त्यांनी 191 कोटींची मालमत्ता उमेदवारी अर्जासोबतच्या प्रतिज्ञापत्रात जाहीर केली होती. त्यामुळेही या कारवाईला महत्त्व आले आहे.
बागवान यांच्या गंदिगवाड व हुबळी  येथील घरावर शनिवारी पहाटे एकाच वेळी प्राप्तिकर अधिकार्‍यांनी छापा टाकला. 

प्राप्तिकरच्या 13 अधिकार्‍यांच्या पथकाने गंदिगवाड निवासस्थानी छापा टाकून कागदपत्रांची तपासणी केली. त्याबरोबर हुबळीतील अरविंद नगरातील निवासस्थान तसेच विद्यानगरातील कार्यालयावर देखील प्राप्तिकरच्या 15 अधिकार्‍यांनी छापा टाकला. 

मालमत्तेची कागदपत्रे व अन्य ऐवजांची तपासणी करण्यात आली. तसेच बेळगाव येथील विविध बँकांमध्ये असलेल्या त्यांच्या खात्यांची चौकशी करण्याबरोबर तीन महागड्या चारचाकीही ताब्यात घेतल्या आहेत. बागवान यांचे पुत्र रईस आणि रमीझ यांचीदेखील तब्बल तीन तास चौकशी करण्यात आली. छाप्यात प्राप्तिकरच्या अधिकार्‍यांना मोठी माहिती हाती लागल्याची चर्चा असून अधिकार्‍यांनी निश्‍चित आकडेवारी सांगण्याचे टाळले आहे. या छाप्यामुळे इतरांचेही धाबे दणाणले असून निजद कार्यकर्ते संभ्रमावस्थेत आहेत.

छाप्यांबाबत प्रतिक्रिया मिळवण्यासाठी नासिर बागवान यांच्या मोबाईलवर दै. ‘पुढारी’ने संपर्क साधला. मात्र, बागवान यांच्याकडून रात्री उशिरापर्यंत प्रतिसाद मिळाला नाही.