Mon, May 20, 2019 20:06होमपेज › Belgaon › जगातील सर्वांत मोठा सौरऊर्जा प्रकल्प पावगड

जगातील सर्वांत मोठा सौरऊर्जा प्रकल्प पावगड

Published On: Mar 03 2018 1:52AM | Last Updated: Mar 02 2018 10:42PMतुमकूर : प्रतिनिधी      

जगातील आठव्या आश्चर्यानंतर आता आणखी एकाची भर पडणार आहे. पावगड येथील सोलारपार्क हे जगातील नववे आश्चर्य ठरेल, असा विश्वास मुख्यमंत्री सिध्दरामय्या यांनी व्यक्‍त केला. पावगड (जि.तुमकूर) तालुक्यातील तिरुमणी येथे भव्य सोलार पार्कचे उद्घाटन मुख्यमंत्र्यांच्या हस्ते गुरुवारी करण्यात आले. यावेळी ते बोलत होते.

एकूण 2 हजार मे. वॅट सौर उत्पादन शाखेची निर्मिती येथे करण्यात आली आहे. पहिल्या टप्प्यात 600 मेगावॅट वीज उत्पादन करण्यात येईल. त्यानंतरच्या काळात 1400 मे.वॅट वीज जनतेला उपलब्ध करून दिली जाणार आहे. 2000 मे. वॅट विजेपैकी  1800 मे.वॅट वीज ही वितरण केंद्राकडून खरेदी केली जाणार असल्याचे सिध्दरामय्या म्हणाले. 

इतका मोठ्या प्रमाणात वीज निर्मिती म्हणजे राज्याच्या शिरपेचात मानाचा तुरा खोवल्याचे होणार आहे. प्रकल्पासाठी  भूसंपादन प्रक्रिया न राबविता शेतकर्‍यांकडून जमिनी 28 वर्षांसाठी भाडे तत्वावर घेण्यात येणार आहेन. प्रतिवर्षी एकरी 21 हजार रु. भाडे देण्यात येत आहे. प्रत्येक दोन वर्षांतून मूळ भाडे दरात 5 टक्क्यांनी वाढ करण्यात येईल. संबंधित शेतकरी हाच शेतजमिनीचा मालक राहणार आहे.
राज्यातील  अत्यंत मागास तालुका म्हणून ओळखला जाणारा पावगड हा सौरपार्कमुळे उजेडात येणार आहे. तसेच अनेक बेरोजगारांना येथे रोजगार मिळणार असून तरुणांचे रोजगारासाठी स्थलांतर होण्याचे प्रमाण घटणार आहे. त्याचबरोबर त्यांचा  आर्थिक, सामाजिक व शैक्षणिकदृष्ट्या विकासही होणार आहे.

काय आहे सोलार पार्क?

एकूण 13 हजार एकर प्रदेशात सोलार उत्पादन विभाग उभारण्यात येत असून  आतापर्यंत 12 हजार एकर जमीन शेतकर्‍यांकडून मिळविण्यात आली आहे. सोलार पार्क ही एकूण 16 हजार कोटींची योजना आहे. योजनेसाठी 2,300 शेतकर्‍यांकडून जमीन भाडेतत्वावर घेण्यात आली आहे. जमिनीचे भाडे संबंधित शेतकर्‍यांच्या नावावर गेल्या दोन वर्षांपासून जमा करण्यात येत आहे. भाडे तत्वावर जमीन घेण्याची मुदत28 वर्षांची असून ही मुदत पूर्ण झाल्यानंतर जमीन शेतकर्‍यांकडे हस्तांतरित करण्यात येणार आहे. या योजनेतून 3 हजार बेरोजगारांना रोजगार मिळणारआहे.

वीजपुरवठा अंखडितपणे 

इंधनमंत्री डी.के.शिवकुमार म्हणाले, परीक्षेच्या काळात वीजपुरवठा खंडित होण्याचे प्रकार अनेकदा घडत असतात. त्यामुळे विद्यार्थ्यांच्या अभ्यासात व्यत्यय येतो. सध्या पीयुसी द्वितीय वर्षाची परीक्षा सुरू आहे. परीक्षा काळात वीज खंडित करण्यात येणार नाही. अखंडितपणे वीज उपलब्ध करून देण्यात येईल.