Mon, Mar 25, 2019 04:57
    ब्रेकिंग    होमपेज › Belgaon › बंडखोरांच्या टोळीला करा हद्दपार : प्रा. एन. डी. पाटील

बंडखोरांच्या टोळीला करा हद्दपार : प्रा. एन. डी. पाटील

Published On: Apr 30 2018 1:42AM | Last Updated: Apr 29 2018 11:57PMखानापूर : वार्ताहर

सीमाप्रश्‍नाच्या निर्णायक क्षणी न्यायालयात लोकेच्छा सिद्ध करण्याची वेळ आली आहे. त्यामुळे तालुक्यातील मतदारांनी बंडखोरांच्या टोळीला हद्दपार करून म.ए. समितीच्या अधिकृत उमेदवाराला कौल द्यावा, अशी साद समितीचे मार्गदर्शक ज्येष्ठ नेते प्रा. एन. डी. पाटील यांनी घातली.जांबोटी येथे आ. पाटील यांच्या प्रचार कार्यालयाचे उद्घाटन  प्रा. पाटील यांच्या हस्ते झाले. त्या सभेत  ते बोलत होते.

माजी ता. पं. सभापती मारुती परमेकर यांनी स्वागत केले. सभेच्या अध्यक्षस्थानी शंकर देसाई होते. प्रा. पाटील म्हणाले, गद्दारी करणार्‍या विलास बेळगावकर आणि माजी आ. दिगंबर पाटील यांच्या टोळक्याला धडा शिकवा. त्यांच्यामुळेच आज सर्वसामान्य कार्यकर्त्यांना उन्हातान्हात फिरावे लागत आहे.

सीमाप्रश्‍नात कोणत्याही प्रकारचे योगदान नसणार्‍या विघ्नसंतोषींनी समितीचे अधिकृत उमेदवार पाडण्याचा डाव आखला आहे. मात्र, सीमाभागातली मराठी भाषक जनता जितकी आक्रमक, तितकीच समजूतदार आहे,  हे त्यांनी विसरू नये. खानापुरातही त्यांनी विष कालविले असून वेळीच अशा प्रवृत्तीला रोखण्याची गरज आहे. हुतात्म्यांचे बलिदान वाया जाऊ नये यासाठी सीमाप्रश्‍नाची सोडवणूक हेच एकमेव उद्दिष्ट आहे, असे विचार मध्यवर्तीचे अध्यक्ष दीपक दळवी यांनी व्यक्त केले.