Thu, May 23, 2019 04:23होमपेज › Belgaon › श्रावणात आता केवळ पालेभाज्यावरच भर...

श्रावणात आता केवळ पालेभाज्यावरच भर...

Published On: Aug 11 2018 1:19AM | Last Updated: Aug 10 2018 9:03PMबेळगाव : परशराम पालकर

पावसाला सुरुवात झाल्यानंतर दोन महिन्यांनी श्रावण मासाचा प्रारंभ होतो. पूर्वजांनी श्रावण महिन्यात मांसाहार व्यर्जची प्रथा पाडली आहे. कारण या काळात कृमी, कीटक तयार होत असतात. रोगजंतूला वाढीसाठी पोषक वातावरण तयार होते. या काळात प्राण्यांनासुध्दा रोग होण्याची शक्यता असते. त्यासाठी मांसाहार करू नये, असे शास्त्रीय कारण आहे.  या काळात वर्षभर न मिळणार्‍या औषधी गुणधर्माच्या भाज्या मिळतात. त्या सेवन केल्याने आरोग्य चांगले राहते.

श्रावण हिंदू धर्मात पवित्र महिना मानला जातो. या काळात मांसाहार वर्ज्य असल्याने पालेभाज्या, फळभाज्या व गोड पदार्थ खाण्याची प्रथा आहे. यामुळे आपले कोणतेही नुकसान न होता उलट गुणकारी औषधी पालेभाज्या आहारात घेतल्याने आरोग्य उत्तम राहते. पूर्वी शहरासह ग्रामीण भागात परड्यात मंडप घालून त्यावर विविध वेल वाढवून भाज्या मिळविल्या जात. आता सर्व प्रकारच्या भाज्या बाजारात विकत मिळतात. मात्र श्रावणातील मोजक्याच भाज्या बाजारात येतात. काही भाज्यांची माहिती असणार्‍या गृहिणी काळाच्या ओघात लुप्‍त झाल्या. 

श्रावण सुरु झाल्यापासून ते अनंत चतुर्दशीपर्यंत मांसाहार वर्ज्य असतो. हा काळ निघून गेल्यानंतर पाऊसदेखील ओसरतो. रोगराई कमी होते. यानंतर मांसाहार केल्यास आरोग्याला बाधा पोहचत नाही. पूर्वी परसात पिकविलेल्या विविध नमुन्याच्या पालेभाज्यांचा समावेश आहारात असायचा. आता मोहरी, कामुना, शेवग्याचा मोहर, फातरी, चाकवत, किरळ (बांबूचा गाभा), काकडी, तांदळीची भाजी, फागली, पडवळ, दोडके, वेलवांगे, श्रावणघेवडा, रानकारले, केनी, कुरडू,  पोकळा, माठ, दारची, राजगिरा, आंबाडा, भोपळ्याचा पाला, मेथी यापैकी बर्‍याचशा भाज्या आपल्या अवती भोवती असूनदेखील त्या माहीत नसतात. बाजारात आलेल्या भाज्या माहीत असतात. यापैकी काही भाज्या वर्षभर पिकविल्या जातात.

औषधी वनस्पती भाज्या

मोहरी, कामुना, शेवग्याचा मोहर, फातरी, चाकवत, किरळ (बांबूचा गाभा), काकडी, तांदळीची भाजी, फागली, पडवळ, दोडके, वेलवांग, श्रावण घेवडा, रान कारले, केनी, कुरडू,पोकळा, माट, दारची, राजगीरा, आंबाडा, भोपळ्याचा पाला, मेथी