Fri, Apr 26, 2019 18:18होमपेज › Belgaon › अपहरण करून मारहाण : अभय पाटील समर्थकांवर आरोप

दक्षिणेत काँग्रेस?भाजपमध्ये राडा

Published On: May 12 2018 1:26AM | Last Updated: May 11 2018 11:28PMबेळगाव : प्रतिनिधी

बेळगाव दक्षिण मतदारसंघात भाजप व काँग्रेस कार्यकर्त्यांमध्ये प्रचारावेळी हाणामारी झाल्याची घटना शुक्रवारी सायंकाळी गणेशपूर गल्ली येथे घडली. यात काँग्रेस कार्यकर्ता राजू शेट्याप्पा गुंजीकर (वय 50, रा. खासबाग) जखमी झाला. 

माजी आमदार अभय पटील यांच्या सात ते आठ कार्यकर्त्यांकडून मारहाण केल्याचा आरोप त्यांनी केला आहे. त्यांच्यावर जिल्हा रुग्णालयात उपचार करण्यात येत आहेत. शहापूर पोलिस स्थानकात रात्री उशिरापर्यंत तक्रार दाखल करण्याची प्रक्रिया सुरू होती.

जाहीर प्रचार गुरुवारी समाप्त झाला. शुक्रवारी पक्षांच्या कार्यकर्त्यांनी मतदारांच्या घरोघरी जाऊन प्रचार करण्यावर भर दिला होता. दक्षिण मतदारसंघात भाजप व काँग्रेस कार्यकर्ते प्रचार करत होते. 

शुक्रवारी सायंकाळी गणेशपूर गल्लीमध्ये भाजप व काँग्रेस कार्यकर्ते आमनेसामने आले. पैसे वाटप करण्यात येत असल्याच्या आरोप-प्रत्यारोपातून राडा झाला. मी गणेशपूर गल्लीत थांबलो असता भाजपच्या कार्यकर्त्यांनी दुचाकीवरून अपहरण  करून अलारवाड क्रॉस येथे जबर मारहाण केली. पैसे वाटतोस असे म्हणून लाथाबुक्क्यांनी हल्ला केला. चाकूने मानेवर वार केला.  आपले कपडेही फाडले, असा आरोप गुंजीकरेन केला आहे. 

घटनेनंतर शहापूर पोलिस स्थानकाबाहेर भाजप व काँग्रेस कार्यकर्त्यांची मोठी गर्दी जमली. भागात काही काळ तणाव होता. बंदोबस्तात वाढ करण्यात आली आहे.