Wed, Nov 14, 2018 16:39होमपेज › Belgaon › नारायण गौडांच्या विरोधात जमखंडीत निषेध मोर्चा

नारायण गौडांच्या विरोधात जमखंडीत निषेध मोर्चा

Published On: Jan 10 2018 1:56AM | Last Updated: Jan 09 2018 11:55PM

बुकमार्क करा
 

जमखंडी : वार्ताहर 

जमखंडीत छ. शिवभक्‍तांनी भव्य मोर्चा काढून करवे राज्याध्यक्ष नारायणगौडांचा तीव्र निषेध केला व त्यांना कर्नाटकातून हद्दपार करण्याच्या मागणीचे निवेदन प्रांताधिकारी कार्यालयात सादर केले.  येथील ए.जी.देसाई सर्कल मधून मोर्चाला प्रारंभ झाला. प्रमुख मार्गावरून मोर्चा येथील शिवाजी चौकात आल्यावर छ. शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला पुष्पहार घालून नंतर मोर्चा प्रांताधिकारी कार्यालयावर नेण्यात आला.

येथे विष्णू सावंत, सिद्धू दिवाण, नंदू गायकवाड, संगमेश निराणी, राहुल कलूती, श्रीकांत मुधोळे, शिवाजी घोरपडे आदींनी निषेध करून शिवाजी महाराजांच्या जयकारास बंदी घालण्याची मागणी करणार्‍या नारायणगौडाविरूद्ध कारवाई करून त्याला हद्दपार करण्याची मागणी केली.  शिरस्तेदार नायकलम यांना निवेदन देण्यात आले.