Tue, Apr 23, 2019 23:39होमपेज › Belgaon › गोकर्ण देवस्थान सरकारच्या ताब्यात

गोकर्ण देवस्थान सरकारच्या ताब्यात

Published On: Aug 12 2018 1:01AM | Last Updated: Aug 11 2018 11:06PMबंगळूर : प्रतिनिधी

कारवार जिल्ह्यातील महत्त्वपूर्ण धार्मिक स्थळ म्हणून ओळखले जाणार्‍या गोकर्ण मंदिराचा ताबा उच्च न्यायालयाने सरकारकडे सोपविण्याचा निर्णय शुक्रवारी दिला आहे. यामुळे मागील दहा वर्षापासून शिमोगा जिल्ह्यातील होसनगर येथील रामचंद्रपूर मठाचा अधिकार संपुष्टात आला आहे. 

गोकर्ण मंदिराच्या मालकीवरून मागील दहा वर्षापासून न्यायालयात वाद सुरू होता. तत्कालीन मुख्यमंत्री बी. एस. येडियुराप्पा यांनी गोकर्ण मंदिराचे  रामचंद्रपूर मठाकडे मालकी अधिकार रद्द करण्यात आले आहेत. गोकर्ण मंदिर धर्मादाय खात्याकडे वर्ग केले आहे. न्यायालयाने मंदिर  व्यवस्थापनासाठी कारवारचे जिल्हाधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली समिती नेमली आहे . मंदिराचा ताबा जिल्हाधिकारी यांच्या अध्यक्षतेखालील समितीकडे 10 सप्टेंबरपासून राहणार आहेत.

मंदिर व्यवस्थान समितीमध्ये कारवार जिल्हाधिकारी, जिल्हा पोलिसप्रमुख,  कुमठा उपविभागाधिकारी, दोन प्रतिष्ठित नागरिक अथवा अभ्यासक, गोकर्ण देवस्थानचे दोन पदाधिकारी यांचा समावेश राहणार आहे.

गोकर्ण येथील महाबळेश्‍वर मंदिर रामचंद्रपूर मठाकडे हस्तांतरित करण्याचा निर्णय तत्कालीन मुख्यमंत्री बी. एस. येडियुराप्पा यांनी 12 ऑक्टोबर 2008 मध्ये घेतला होता. यावर महाबळेश्‍वर मंदिर ट्रस्ट आणि ट्रस्टी भालचंद्र दीक्षित यांनी उच्च न्यायालयात जनहित याचिका दाखल केली होती. त्यावर न्यायाधीश बी. व्ही. नागरत्न व अरविंद कुमार यांनी उपरोक्त निर्णय दिला आहे.

घटनाक्रम

12 ऑक्टोबर 2008 रोजी गोकर्ण मंदिर रामचंद्रपूर मठाकडे हस्तांतरित करण्याचा निर्णय
मंदिर ट्रस्टींची उच्च न्यायालयात जनहित याचिका
गोकर्ण देवस्थान हस्तांतरित करण्याचा अधिकार सरकारला नाही, यामुळे मंदिर धर्मादाय खात्याकडे वर्ग करावे. 10 वर्षाच्या सुनावणीनंतर न्यायालयाचा निर्णय.