Fri, Apr 26, 2019 19:38होमपेज › Belgaon › तब्बल २१ तासांनी महामार्ग पूर्ण खुला

तब्बल २१ तासांनी महामार्ग पूर्ण खुला

Published On: Jul 01 2018 1:51AM | Last Updated: Jul 01 2018 12:38AMनिपाणी : प्रतिनिधी

बेळगाव-कोल्हापूर महामार्ग तब्बल 21 तासानंतर शनिवारी दुपारी तीनच्या सुमारास पूर्णपणे खुला झाला. शुक्रवारी सायंकाळी सहाच्या सुमारास गॅसवाहू टँकर तवंदी घाटात उलटल्याने महामार्ग 5 तास ठप्प होता. तर शुक्रवारी रात्री साडेअकरापासून एका बाजूने वाहतूक सुरू होती. शनिवारी  दुपारी टँकर रस्त्याच्या बाजूला करून तो पूर्णपणे खुला करण्यात आला.

केरळहून मुंबईकडे शुक्रवारी सायंकाळी प्रोपिलीन गॅस भरून जाणार्‍या टँकरचालकाचा ताबा सुटल्याने तवंदी घाटात टँकर उलटला होता. प्रशासनाने खबरदारी म्हणून महामार्गावरून होणारीवाहतूक रोखून धरली होती.

टँकरमधील गॅस रिकामी झाल्याची खात्री झाल्यानंतर महामार्ग वाहतुकीसाठी खुला करून देण्यात आला. मात्र, घटनास्थळी रुग्णवाहिका, अग्‍निशमनचेदोन बंब तैनात करण्यात आले होते.

तर शनिवारी दुपारी एकच्या सुमारास कोल्हापूर येथील तीन के्रन मागवून दुपारी 3 च्या सुमारास अपघातग्रस्त टँकर बाजूला केला. अपघातील जखमी चालक  रणजीतसिंह व क्‍लिनर जितेंद्र यांच्या प्रकृतीत सुधारणा होत असल्याची माहिती सरकारी म. गांधी रूग्णालय सूत्रांनी दिली.

इंडस्ट्रियल वापरासाठी उपयोगात येणारा प्रोपिलीन गॅस घेऊन चालक रणजीतसिंह मुंबईच्या दिशेने जात होता. सीपीआय किशोर भरणी, एनकेएलईचे लक्ष्मण चौगुले, पुंजलॉईडचे सेफ्टी ऑफिसर रामकुमार मिश्रा, मुख्याधिकारी ई. के. किटली, भरारी पथकाचे शरीफ करोली, एम. आर. घाटगे, अग्निशामक विभागाचे निरीक्षक ए. के. नदाफ यांनी वाहतूक सुरळीत करण्यासाठी मदत केली.