Tue, May 26, 2020 21:46होमपेज › Belgaon › विसर्जन मिरवणूक मार्ग ‘नो पार्किंग झोन’

विसर्जन मिरवणूक मार्ग ‘नो पार्किंग झोन’

Published On: Sep 11 2019 2:29AM | Last Updated: Sep 11 2019 12:34AM
बेळगाव : प्रतिनिधी
गणेश उत्सव विसर्जन मिरवणुकीसाठी वाहतूक मार्गात बदल करण्यात आला आहे. याचे सविस्तर पत्रक पोलिस आयुक्‍तालयाने मंगळवारी प्रसिध्दीस दिले. दि. 12 रोजी दुपारी 2 वाजल्यापासून 13 सप्टेंबर रोजी मिरवणुकीची सांगता होईपर्यंत हा बदल राहणार आहे. मिरवणुकीच्या पार्श्‍वभूमीवर मंगळवारी शहरात विविध भागात पोलिसांनी पथसंचलन केले.

चन्‍नम्मा सर्कलपासून कॉलेज रोडमार्गे खानापूरकडे जाणारी वाहतूक चन्‍नम्मा सर्कलमधील गणेश मंदिराच्या पाठीमागील बाजूने क्‍लब रोडमार्गे वळविण्यात येणार आहे. ही वाहने क्‍लब रोड, म.गांधी सर्कल (अरगन तलाव), शौर्य चौक, केंद्रीय विद्यालय क्रमांक-2, शरकत पार्क, ग्लोबथिएटर सर्कलमार्गे खानापूरला वळविण्यात येणार आहे.

जिजामाता सर्कलमधून देशपांडे पेट्रोलपंप, नरगुंदकर भावे चौक (कंबळी खुट), पिंपळकट्टा, पाटील गल्‍लीकडे जाणारी सर्व वाहने जिजामाता सर्कलमधून थेट जुन्या पी. बी. रोडमार्गे पुढे सोडण्यात येतील.
नाथ पै सर्कलवरून बँक ऑफ इंडियामार्गे कपिलेश्‍वर रेल्वे ओव्हरब्रिजवरून जाणारी सर्व वाहने एसपीएम रोड, भातकांडे स्कूलच्या उजव्या बाजूला वळून कपिलेश्‍वर कॉलनी, व्हीआरएल लॉजिस्टीक मार्गे सोडण्यात येतील.

जुना पी. बी. रोड, व्हीआरएल लॉजिस्टीक, भातकांडे स्कूलकडून कपिलेश्‍वर रेल्वे ओव्हरब्रिजकडे येणारी वाहने भातकांडे स्कूल क्रॉसजवळ डाव्या बाजूला शिवाजी गार्डन, बँक ऑफ इंडिया क्रॉस, महात्मा फुले रोडकडे वळविण्यात येणार आहे.

जुना पी. बी. रोड, यश हॉस्पिटल, महाद्वार रोड, कपिलेश्‍वर मंदिरकडून रेल्वे ओव्हरब्रिजकडे जाणारी सर्व वाहने यश हॉस्पिटलपासून डाव्या व उजव्या बाजूला, भातकांडे स्कूल, तानाजी गल्‍ली व येथील रेल्वे फाटकाकडे वळविण्यात येतील.

गुडशेड् रोडमार्गे कपिलेश्‍वर पुलाकडे येणारी सर्व वाहने एसपीएम रोडकडे न सोडता मराठा मंदिर, गोवा वेसकडे सोडण्यात येतील. खानापूर रोड, बीएसएनएल कचेरी क्रॉस, स्टेशन रोड व गोगटे सर्कलकडून रेल्वे स्टेशन, हेड पोस्ट ऑफिस सर्कलमधून शनि मंदिरकडे येणारी सर्व वाहने ग्लोब थिएटरपासून डाव्या बाजूला वळवून ती शरकत पार्क, केंद्रीय विद्यालय क्रमांक-2, शौर्य चौक, गांधी सर्कल, क्‍लबरोड मार्गे चन्‍नम्मा सर्कलपासून पुढे सोडण्यात येतील.

मिरवणुकीच्या काळात दुहेरी रस्त्यापैकी एका बाजूचा रस्ता हा पूर्णपणे मिरवणुकीसाठी उपयोगात आणला जाणार आहे, याची सर्व बेळगावकरांनी नोंद घ्यावी, असे आवाहनही पोलिस आयुक्तालयाने केले आहे. 

गणेशभक्तांसाठी पार्किंग स्थळे 

   बेननस्मिथ कॉलेज मैदान
  यंदेखूट पासून देशपांडे खूटकडे जाणारा वनिता विद्यालयाचा बोळ
  धर्मवीर संभाजी चौकाजवळील लिंगराज पाटील यांची खुली जागा
  फिश मार्केटपासून इस्लामिया स्कूलकडे जाणारा पूर्ण रस्ता
  मराठा विद्यानिकेतनचे मैदान
  देशपांडे खूटपासून अरगन तलावाकडे जाणार्‍या रस्त्यावर एका बाजूला वाहन पार्किंगची सोय 
  खंजर गल्‍लीतील पार्किंग स्थळ
  महाद्वार रोडवरील संभाजी उद्यान

मिरवणूक मार्गावर पार्किंगवर निर्बंध 

मिरवणुकीच्या मार्गावर नरगुंदकर भावे चौक, मारुती गल्‍ली, हुतात्मा चौक, रामदेव गल्‍ली, समादेवी गल्‍ली, कॉलेज रोड, धर्मवीर संभाजी चौक, रामलिंग खिंड गल्‍ली, टिळक चौक, हेमू कलाणी चौक, शनी मंदिर, कपिलेश्‍वर उड्डाणपूल, कपिलेश्‍वर मंदिरच्या दोन्ही बाजूचा रस्ता, कॅम्प परिसरातील हॅवलॉक रोड, कॅटल रोड, यंदे खूटपासून देशपांडे खूट ते पवन हॉटेलपर्यंतच्या रस्त्यावर 12 रोजी दुपारी 2 पासून 13 रोजी मिरवणुकीची सांगता होईपर्यंत सर्व प्रकारची वाहने लावण्यावर निर्बंध घालण्यात आले आहेत.