होमपेज › Belgaon › अवैध मद्य वाहतूक : 5 जणांना अटक

अवैध मद्य वाहतूक : 5 जणांना अटक

Published On: Apr 09 2018 1:32AM | Last Updated: Apr 09 2018 12:48AMबेळगाव : प्रतिनिधी

विधानसभा निवडणुकांच्या पार्श्‍वभूमीवर जिल्ह्यात अनेक ठिकाणी चेकपोस्ट उभारण्यात आले आहे. अवैधरित्या मद्याची वाहतूक करणार्‍यांवर पोलिसांनी विशेष नजर ठेवली आहे. कणकुंबी येथील पोलिसांनी केलेल्या कारवाईत अवैध मद्य वाहतूक प्रकरणी 5 जणांना अटक करण्यात आली आहे. 

कणकुंबी येथील चेकपोस्टवर दुचाकीवरून मद्य वाहतूक करणार्‍या 5 युवकांना अबकारी व पोलिस खात्याच्या अधिकार्‍यांनी अटक केली. त्यांच्याकडून तीन  दुचाकी, 65 लिटर गोवा बनावटीची  दारू व 36 लिटर बिअर जप्त केली आहे. राजू, मिनाजी, अल्लप्पा, अरुण, राजू अशी संशयितांची नावे आहेत. 

याप्रकरणी खानापूर अबकारी विभागीय पोलिस स्थानकात गुन्हा दाखल केला आहे. सदर युवकांकडून विना परवाना दुचाकीवरून मद्य घेऊन जाण्यात येत होते. गस्तीवरील पोलिसांनी त्यांची झडती घेतली असता मद्यसाठा आढळला. चोरट्या मार्गावरून मद्याची वाहतूक होत आहे. त्यामुळे या भागात ये- जा करणार्‍या वाहनांवर विशेष नजर ठेवल्याचे जिल्हाधिकारी झियाउल्ला एस. यांनी सांगितले. 

Tags : Belgaum, Belgaum news, Illegal liquor traffic, 5 people, arrested,