Sun, Jul 21, 2019 08:37होमपेज › Belgaon › कर्नाटकात त्रिशंकू विधानसभा; क्राँग्रेस नंबर १

कर्नाटकात त्रिशंकू विधानसभा; काँग्रेस नंबर १

Published On: Apr 15 2018 1:34AM | Last Updated: Apr 15 2018 8:58AMनवी दिल्ली : प्रतिनिधी

कर्नाटकात पुढील महिन्यात होणार्‍या विधानसभा निवडणुकीचा सर्वसाधारण अंदाज इंडिया टुटे टीव्ही व कार्मीने संयुक्तपणे शुक्रवारी जाहीर केला आहे. कोणताही पक्ष स्पष्ट बहुमत मिळवू शकणार नाही. काँग्रेस सर्वाधिक तर भाजप द्वितीय स्थानावर त्या खालोखाला निधर्मी जनता दल असेल. निवडणूक निकाल हा त्रिशंकू असेल, असे उपरोक्त संस्थांनी सर्वेक्षणात म्हटले आहे.

राज्यात विधानसभेच्या 224 जागा असून कोणत्याही पक्षाला बहुमत सिध्द करण्यासाठी 113 जागांची आवश्यकता असणार आहे. सत्तारूढ काँग्रेस 90 ते 101 जागा मिळवू शकेल, असे सर्वेक्षणात म्हटले आहे. भाजपला 78 ते 86 जागा तर निजदला 34 ते 43 जागांवर समाधान मानावे लागेल. निकाल त्रिशंकू असताना सरकार स्थापनेत निजद हा किंगमेकर ठरेल, असेही सर्वेक्षणातून स्पष्ट करण्यात आले आहे.

टक्केवारीत क्राँग्रेस नं.1

मतदान टक्केवारीत काँग्रेस प्रथम स्थानावर म्हणजे 37 टक्के, भाजप 35 टक्के व निजद 19 टक्के मते मिळविल असा अंदाज आहे. राज्यातील सर्व 224 मतदान केंद्रातील मतदारांचा कानोसा घेऊन हा अंदाज जाहीर करण्यात आला आहे. सर्वाधिक मते ग्रामीण भागातून जाणून घेण्यात आली असल्याचे इंडिया टुडे ने म्हटले आहे.

लिंगायत धर्म

विधानसभा निवडणूक डोळ्यासमोर ठेवून मुख्यमंत्री सिध्दरामय्यांनी लिंगायतांना स्वतंत्र धर्माची मान्यता मिळवून देऊन लिंगायतांची मते काँग्रेसकडे वळविण्याची खेळी केली असल्याचा आरोप भाजपने काही दिवसांपूर्वी केला होता. मुख्यमंत्र्यांच्या या प्रयत्नाला यश येणार नाही, असेही भाजपने म्हटले होते. मात्र पुढीलवेळी राज्यात काँग्रेस सरकार आल्यास  लिंगायत हा स्वतंत्र धर्म म्हणून अस्तित्वात येणारच या आशेवर असलेल्या लिंगायतांची मते काँग्रेस पक्षाकडे वळणार व त्यामुळे त्यांचे बलाबल वाढणार असे संकेत मिळाले आहेत.

टिपू जयंतीबाबत मतभेद

टिपू सुलतान जयंती साजरी करण्याच्या राज्य सरकारच्या निर्णयाला भाजपचा कडाडून विरोध होत राहीला. 32 टक्के नागरिकांनी सरकारच्या निर्णयाला संमती दर्शविली  तर 44 टक्के नागरिकांनी विरोध दर्शविला. उर्वरित 58 मुस्लिम समुदायाने सरकारच्या निर्णयाचे स्वागत केले.

 Tags :Hung Assembly , Karnataka,belgaon news