होमपेज › Belgaon › चोवीस तास पाणी योजनेचे पहिले शहर हुक्केरी

चोवीस तास पाणी योजनेचे पहिले शहर हुक्केरी

Published On: Mar 16 2018 1:23AM | Last Updated: Mar 15 2018 11:17PMहुक्केरी : प्रतिनिधी

हुक्केरी मतदारसंघ आदर्शवत बनविण्यासाठी गेल्या 5 वर्षांत अनेक विकासकामे हाती घेऊन पूर्णत्वास नेली आहेत. हुक्केरी शहराला  24 तास पाणी योजना सुरु होणार असून, राज्यात पहिल्यांदाच ही योजना हुक्केरीत लागू होईल.   हुक्केरी शहरासाठी 100 कोटी रु. व संकेश्वरसाठी 168 कोटी रु.याप्रमाणे एकूण 268 कोटी अनुदान मंजूर असल्याचे आ.उमेश कत्ती यानी सांगितले.

हुक्केरी नगरपरिषद व कर्नाटक शहर पाणीपुरवठा व निस्सारण मंडळ यांच्या संयुक्त सहकार्याने 24 तास पाणीपुरवठा योजना लोकार्पण कार्यक्रम बुधवारी झाला. त्यानिमित्ताने  तुरमंदी हळ्ळदकेरी आवारात आयोजित कार्यक्रमात अध्यक्षस्थानावरून आ.कत्ती बोलत होते.   

सुलतानपूर येथे 29 कोटी रु.खर्चातून सेतूवजा बंधार्‍याचे काम अंतिम टप्प्यात आहे. महाराष्ट्र राज्यातील सर्पनाल?किटवाड दरम्यान 144 कोटी रु.खर्चातून धरण बांधण्यात येत असून यामध्ये 4 टीएमसी पाणीसंग्रह करण्यात येणार आहे.राज्य सरकारकडून 70 कोटी रु.मंजूर झाल्यास महाराष्ट्राच्या या धरणातील 2 टीएमसी पाणी हिरण्यकेशी नदीमध्ये सोडण्यात येईल.याबाबत मुख्यमंत्री सिध्दरामय्यांशी चर्चा करणार असल्याचे आ.कत्ती म्हणाले. पच्चानकेरे (तलाव) भरणीचे काम अंतिम टप्प्यात असून हा तलाव भरल्यास कारंजांना पाणी उपलब्ध होऊन कारंजातून फवारणी सुरू होईल. त्याना गतवैभव मिळेल, असेही आ.कत्ती म्हणाले. 

प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित असलेले जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे अध्यक्ष माजी खा.रमेश कत्ती, शिक्षक आमदार अरूण शहापूर, हुक्केरीचे माजी नगराध्यक्ष उदय हुक्केरी,  अ‍ॅड. प्रकाश मुतालिक,  नजीर मोमीनदादा यांनी आ.कत्ती यांच्या कार्याची माहिती दिली.  आ.कत्ती यांच्या 58 व्या वाढदिवासानिमित्त नगरपरिषदेच्यावतीने शाल, श्रीफळ व भेटवस्तू देऊन सत्कार करण्यात आला.

मान्यवरांच्या हस्ते रोपाला पाणी घालून कार्यक्रमाचे उद्घाटन करण्यात आले. उपनगराध्यक्ष गुरू कुलकर्णी यानी स्वागत व प्रास्ताविक , शिक्षक श्रीशैल मठपती यानी सूत्रसंचलन केले.

स्वतंत्र जलवाहिनेने पाणीपुरवठा

20 वर्षांपूर्वी हुक्केरीतील कारंजे फवारत होते. कारंजांचे फवारे बंद झाल्याने शहरात पाण्याची टंचाई असल्याचे संकेत मिळाले. हुक्केरीत मुलगी देण्यास बाहेरची मंडळी तयार होईना. पाण्याची भीषण टंचाई असलेले शहर अशी हुक्केरीची कुप्रसिध्दी होऊ लागली. मात्र आज परिस्थिती बदली आहे. शहराला चोवीस तास पाणी मिळणार आहे. ही योजना कायार्र्न्वित करण्यासाठी हिडकल धरणातून स्वतंत्र जलवाहिनी टाकण्यात आली आहे, अशी माहितीही देण्यात आली.