Thu, Jul 18, 2019 16:32होमपेज › Belgaon › बेळगाव लवकरच वाहिनीजाळ्यातून मुक्‍त

बेळगाव लवकरच वाहिनीजाळ्यातून मुक्‍त

Published On: Jul 06 2018 1:31AM | Last Updated: Jul 06 2018 1:31AMबेळगाव : परशराम पालकर

शहरात वीजवाहिन्याचे जाळे मोठया प्रमाणात पसरले असून त्यावर उपाय म्हणून भूमिगत वीजवाहिण्या घालण्याचे काम हेस्कॉमने सुरु केले आहे. ते लवकरच पूर्ण होण्याची शक्यता आहे. शहर-उपनगरात 17,580 वीजखांब असून ते उच्चदाब व कमीदाबाच्या व वाहिन्यांसाठी आधाराचे काम करीत आहेत. शहरात 45 वर्षापूर्वीची यंत्रणा असून मोडकळीस आलेले वीजखांब बदलण्याचे काम सुरु आहे. 

शहरात यंदा पावसाने हेस्कॉमचे मोठ्या प्रमाणात नुकसान केले आहे. झाडे व फांद्या पडल्याने वीजखांब, वीजतारा तुटण्याच्या प्रमाणात वाढ झाली आहे. पावसाळ्यात ट्रान्सफॉर्मरला गळती लागून निकामी होण्याचे प्रमाणदेखील वाढीस लागले आहे. 

प्रायोगिक तत्वावर मराठा मंदिर ते गोवावेसदरम्यान भिूमगत वीजवाहिण्या घालण्याचे काम झाले.  त्यानंतर उपनगरात या कामाला सुरुवात करण्यात आली. नेहरुनगर ते चन्नम्मा सर्कलपर्यंत भूमिगत वीजवाहिण्या घालून रस्त्याशेजारी असलेले हायमास्ट वगळता विद्युत खांब हटविले आहेत.

शहरात 11 केव्हीएच क्षमतेच्या भूमिगत वीजवाहिन्या घालण्यात येत आहेत. त्यावर व्यावसायिक व घरघुती  वीजजोडणी करण्यात येणार आहे. उच्च दाबाच्या वीजवाहिन्यांचे शहर परिसरात 432 कि.मि. लांबीचे जाळे पसरले आहे. कमी दाबाच्या वीजवाहिन्यांचे जाळे 908.58 कि. मी. आहेत.