Mon, Feb 18, 2019 03:58होमपेज › Belgaon › हेल्मेटसक्‍ती २७ पासून

हेल्मेटसक्‍ती २७ पासून

Published On: Jan 17 2018 1:56AM | Last Updated: Jan 16 2018 11:22PM

बुकमार्क करा
बेळगाव : प्रतिनिधी   

उत्तर विभागातील जिल्ह्यांमध्ये 26 जानेवारीनंतर हेल्मेट सक्‍ती करण्यात येणार असून याची अंमलबजावणी 27 जानेवारीपासून करण्यात येणार आहे,अशी माहिती उत्तर परिक्षेत्राचे महानिरीक्षक जे. आलोककुमार यांनी हा आदेश बजावला  आहे. 

रस्त्यावर दुचाकींना होणार्‍या अपघातांत काही जण मृत्युमुखी पडत असतात. डोक्यावर हेल्मेट असल्यास बचाव होऊ शकतो. यासाठी दुचाकीचालकांना हेल्मेटची सक्‍ती करण्यात आली आहे. हेल्मेट वापराचे फायदे समजावून देण्यासाठी  जिल्ह्यात 16 जानेवारीपासून जनजागृतीचे कार्य सुरू करण्यात आले असून, ते 26 जानेवारीपर्यंत चालणार आहे. 26 नंतर हेल्मेट न वापरणार्‍यांवर कारवाईचा बडगा उगारण्यात येईल.

वाहन पार्किंगसाठी सम?विषम तारखेवरून पाकिर्र्ंग व्यवस्था करण्यात येणार आहे. बेळगाव शहरातील वर्दळीच्या ठिकाणी ही व्यवस्था करण्यात आली आहे. खानापूर, अथणी, गोकाक, रायबाग, बैलहोंगल शहरांमधूनही सम?विषय तारखांची पार्किंग व्यवस्था करण्यात येणार आहे.

उत्तर विभागातील जिल्ह्यांच्या पोलिस वरिष्ठ अधिकार्‍यांसमवेत  जनसंपर्क बैठक घेऊन जनतेच्या समस्या, तक्रारी जाणून घेऊन त्या सोडविण्याचे प्रयत्न करण्यात येतील. या उपक्रमांतर्गत पहिली जनसंपर्क बैठक 27 जानेवारी रोजी होईल.