Wed, Nov 14, 2018 16:57होमपेज › Belgaon › हेल्मेटसक्ती आदेश जारी 

हेल्मेटसक्ती आदेश जारी 

Published On: Jan 20 2018 1:38AM | Last Updated: Jan 20 2018 12:17AMबेळगाव : प्रतिनिधी   

बेळगाव शहर परिसरातील दुचाकीचालकांना आयएसआय दर्जाचेचे हेल्मेट वापरण्याला सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशावरून सक्ती करण्यात आली आहे. दि. 22 पूर्वी दुचाकीचालकांनी हेल्मेट वापरावे.

आदेशाचे उल्लंघन करणार्‍यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल. शाळा, महाविद्यालय विद्यार्थी? कर्मचारी, संघसंस्था, स्थानिक संस्था कर्मचार्‍यांनाही हेल्मेटसक्ती असेल, असे वाहतूक  पोलिस उपायुक्तांनी कळविले आहे.