Fri, May 24, 2019 02:28होमपेज › Belgaon › हृदय प्रतिरोपण बेळगावात झाले शक्य!

हृदय प्रतिरोपण बेळगावात झाले शक्य!

Published On: Mar 04 2018 1:45AM | Last Updated: Mar 03 2018 11:53PMबेळगाव : प्रतिनिधी

मानवी इतिहासात सर्वाधिक गुंतागुंतीची मानली गेलेली हृदय प्रतिरोपण शस्त्रक्रिया बेळगावातही शक्य झाली आहे. येथील केएलई संस्थेच्या डॉ. प्रभाकर कोरे रुग्णालयात एका 32 वर्षांच्या युवकाच्या शरीरात 42 वर्षीय महिलेचे हृदय प्रतिरोपित करण्यात आले असून, युवक जवळपास ठणठणीत झाला आहे. 

वीरगौडा पाटील असे जीवदान मिळालेल्या युवकाचे नाव आहे. तर त्यांना हृदय देणार्‍या महिलेचे नाव सविता पवार असे आहे. देशातील पहिली हृदय प्रतिरोपण शस्त्रक्रिया काही वर्षांपूर्वी चेन्‍नईत झाली होती.

सविता अजूनही आमच्यात आहे

बेळगाव : प्रतिनिधी

केएलई संस्थेच्या डॉ. प्रभाकर कोरे इस्पितळात 20 फ्रेब्रुवारीला ह्रदयरोपण शस्त्रक्रिया यशस्वी झाली. उत्तर कर्नाटकातील पहिली शस्त्रक्रिया होती. यामुळे बेळगावचे नाव पुन्हा एकदा चर्चेला आले आहे. सविता पवार (बेळगाव) यांचे हृदय वीरगौडा पाटील (ता.अथणी) यांच्या शरीरात प्रतिरोपित करण्यात आले.  खा. डॉ. प्रभाकर कोरे यांनी दिली.

केएलई संस्थेच्या सभागृहात आयोजित पत्रकार परिषदेत सविता पवार यांची आई पुष्पा पवार व वडील भालचंद्र पवार व बहीण उपस्थित होती. यावेळी प्रसारमाध्यमांशी बोलताना त्यांना आश्रृ अनावर झाले. यावेळी डॉ. कोरेही गहिवरले. 

यावेळी बोलातना पुष्पा पवार म्हणाल्या, सविता लहान असतानापासून आम्ही तीची खुप काळजी घेत होतो.जन्माला आली तेव्हापासून तिच्या शरिरात रक्ताची कमतरता भासत होती. तिला नेहमी बाहेरून रक्त घालावे लागत होते. 

ती नेहमी मेंदुच्या आजाराने त्रस्त होती. वीरभद्र पाटील यांना तीचे ह्रदय रोपन करण्यात आले आहे. यामुळे ती नेहमीच आमच्यात आहे. यासाठी केएलई संस्थेने आम्हाला खुप मदत केली. यानंतर सविताच्या बहीनेनेही आपली प्रतिक्रिया व्यक्त करताना  आमची सविता आमच्या सोबत सतत आहे असे सांगितले. वीरभद्र यांच्या कुटुंबीयांनीही आपली प्रतिक्रिया देताना आमच्या मुलांला नवीन जिवनदान दिल्याबद्दल पवार कुटुंबियांचे आभार मानले. 

यानंतर बोलताना डॉ. कोरे यांनी पवार कुटुंबीयांना यापूढे केएलई इस्पितळात मोफत उपचार दिले जातील असे सांगितले. यावेळी सविताच्या आई वडिलांचा सत्कारही करण्यात आला. यावेळी इस्पितळाचे वैद्यकीय संचालक डॉ. एम. व्ही. जाली, शस्त्रचिकित्सक डॉ. रिचर्ड साल्ढाणा, भाजप नेते किरण जाधव आदी अधिकारी उपस्थित होते.