Mon, May 27, 2019 00:41होमपेज › Belgaon › अण्णा हजारे यांची आज बेळगावात सभा

अण्णा हजारे यांची आज बेळगावात सभा

Published On: Jan 05 2018 1:05AM | Last Updated: Jan 04 2018 11:24PM

बुकमार्क करा
बेळगाव : प्रतिनिधी

स्नेहालय संस्था आणि भ्रष्टाचारविरोधी जनआंदोलन समिती आयोजित अण्णा हजारे यांची जाहीर सभा येथील व्हॅक्सीन डेपोवर उद्या, शुक्रवारी दु. 4 वा. आयोजित करण्यात आली आहे. यावेळी हजारो नागरिक उपस्थित राहणार असल्याची माहिती संयोजकांनी दिली आहे.

केंद्रात लोकपाल आणि राज्यात लोकायुक्‍त नियुक्‍त करणे, शेतकर्‍यांच्या पिकास हमीभाव जाहीर करावा, निवडणूक प्रक्रियेत सुधारणा कराव्यात आदी मागण्यांसाठी अण्णा हजारे यांच्याकडून देशव्यापी आंदोलन करण्यात येणार आहे. याच्या जागृतीसाठी राज्याच्या दौर्‍यावर 2 जानेवारीपासून अण्णा हजारे  आहेत. कोप्पळ, हुबळी, धारवाड येथे सभा पार पडल्या असून शेवटची सभा बेळगावात शुक्रवारी होणार आहे. दरम्यान, अण्णा हजारे शुक्रवारी स्नेहालयमार्फत चालविण्यात येणार्‍या विविध शाळांना भेट देणार आहेत. त्यानंतर सायंकाळी 4 जाहीर सभा होणार आहे.