Fri, Feb 22, 2019 15:49होमपेज › Belgaon › बेळगावमार्गे सुरू होणार हमसफर ट्रेन

बेळगावमार्गे सुरू होणार हमसफर ट्रेन

Published On: Feb 11 2018 12:54AM | Last Updated: Feb 10 2018 10:50PMबेळगाव : प्रतिनिधी

केंद्र सरकारने गेल्या साडेतीन वर्षांत कर्नाटकसाठी भरीव निधी दिला आहे. तसेच राज्यातील रेल्वेसेवेच्या सुधारणेबाबत अनेक योजनांची अंमलबजावणी केली आहे. याअंतर्गत 19 फेब्रुवारी रोजी म्हैसूर—बंगळूर रेल्वेमार्गाच्या विद्युतीकरणाला हिरवा झेंडा दाखविण्यात येणार आहे. याच दिवशी पंतप्रधान नरेंद्र मोदी बेळगावमार्गे जाणार्‍या हमसफर रेल्वेचीही घोषणा करणार असल्याची माहिती केंद्रीय रेल्वे आणि कोळसा खाणमंत्री पीयूष गोयल यांनी दिली.

उद्यमबाग येथील कार्यक्रमात बोलताना ना. गोयल म्हणाले, म्हैसूर—बंगळूरदरम्यानच्या रेल्वेमार्गाच्या विद्युतीकरणाच्या उद्घाटनाला पंतप्रधान मोदी 19 फेब्रुवारी रोजी म्हैसूरला येणार आहेत. विद्युतमार्गाच्या उद्घाटनाबरोबरच त्या दिवशी सहा राज्यांतून जाणार्‍या हमसफर रेल्वेची घोषणा करणार आहेत. म्हैसूरहून सुरू होणारी हमसफर रेल्वे पुढे तुमकूर, दावणगेरे, हुबळी—धारवाड, बेळगाव, मिरज, पुणे, कल्याण, सुरत, आळंद, रतलाम, उदयपूर, अजमेर, चितोडगड, जयपूरमार्गे दिल्‍लीला पोहोचेल.