Thu, Jun 27, 2019 02:36होमपेज › Belgaon › गुजरात पोलिस निवडणूक बंदोबस्तासाठी अथणीत!

गुजरात पोलिस निवडणूक बंदोबस्तासाठी अथणीत!

Published On: May 12 2018 1:26AM | Last Updated: May 11 2018 8:03PMअथणी : प्रतिनिधी

12 मे रोजी होणार्‍या विधानसभा निवडणुकीच्या पार्श्‍वभूमीवर अथणी मतदारसंघात गुजरातहून पोलिसांचा ताफा आला आहे. संवेदनशील आणि अतिसंवेदनशील मतदान केंद्रावर बंदोबस्तासाठी हे पोलिस तैनात करण्यात येणार आहेत. 

राज्यात एकाच वेळी विधानसभा निवडणुका होत असल्याने अन्य राज्यातील पोलिस मतदार संघात दाखल झाले आहेत. यामध्ये केंद्रीय पोलिस दलाच्या सहा तुकड्या तसेच गुजरात पोलिस पथकाचा समावेश आहे. 

निवडणूक प्रक्रिया शांततेत पार पडण्यासाठी प्रत्येक गावात पोलिसांचे पथसंचलन  झाले. यावेळी शांततेने मतदान करण्याचे आवाहन करण्यात आले आहे. अथणी मतदारसंघात 224 बुथ आहेत. प्रत्येक बुथवर दोन पोलिस नियुक्त करण्यात येणार आहेत. मतदानकेंद्रावर करडी नजर ठेवण्यात आली असून आतापासूनच गस्त घालण्याचे काम सुरू झाले आहे. 

11 मे रोजी नेमणूक करण्यात आलेले कर्मचारी आपापल्या मतदान केंद्रावर जाणार असून त्याची तयारी एमएमएस विद्यालय, अथणी येथे सुरू आहे.