Mon, May 20, 2019 20:58होमपेज › Belgaon › बाजारपेठेत 30 कोटींची उलाढाल

बाजारपेठेत 30 कोटींची उलाढाल

Published On: Mar 18 2018 11:39PM | Last Updated: Mar 18 2018 11:23PMबेळगाव : प्रतिनिधी  

साडेतीन मुहूर्तापैकी एक असलेल्या गुढी पाडव्याला बाजारपेठेत विविध वस्तूंच्या खरेदी ऑफर्सवर ग्राहकांनी शॉपिंग संडे साजरा केला.  बाजारपेठेत अंदाजे 30 कोटी रुपयांची उलाढाल झाल्याचे व्यापार्‍यांनी सांगितले. बहुतांश इलेक्ट्रॉनिक्स वस्तूंना मोठा पसंती होती. रियल इस्टेटमध्येही उत्साहाचे वातावरण होते.  खडेबाजार, गणपत गल्ली येथे सराफी दुकानात मोठी गर्दी होती. लग्नसराईच्या पार्श्‍वभूमीवर गारमेंट क्षेत्रातही मोठी उलाढाल झाली. 

सोनसळी पाडवा 

सराफीपेठेत गुंजभर का होईना सोने खरेदी करावे, ही पारंपरिकता पाडव्याच्या महूर्तावर जपली जाते. काही वर्षात मोठ्या प्रमाणात बँकिंग घोटाळे उजेडात येत असल्याने सोने खरेदी सुरक्षित ठेव समजून खरेदीकडे ग्राहकांचा कल होता. सुमारे 15 कोटींची उलाढाल सराफी व्यवसायात झाली. 

8 हजार मोबाईलची विक्री 

स्मार्ट फोनची क्रेझ दिवसेंदिवस वाढत आहे. यासाठीही पाडव्याचा मुहूर्त साधला गेला. ‘101 रुपयांवर’, ‘शून्य व्याज’, ‘5 मिनिटात लोन’  अशा ऑफर्सची संधी ग्राहकांनी घेतली. शहर उपनगरात लहान-मोठ्या मोबाईल दुकानातून सुमारे 8 हजार मोबाईलची विक्री झाल्याचे  समजते.

यंदा ऑफर्सची चलती ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी लहान मोठ्या होम अप्लायन्सवर ऑफर्सची चलती दिसून आली. एलईडी, फ्रीज, होमथिएटर, फॅन खरेदीचा उच्चांक झाला. दुचाकी, चारचाकी खरेदीची क्रेझ  पी. बी. रोड येथील पॅटसन फोर्ड, वैभवनगर येथील मारुती शोरूम, कॅम्प येथील होंडा शोरूम, उद्यमबाग येथील हुंडाई शोरूम, विनायक मंदिराशेजारी बेल्लद मोटार्स व पी. बी. रोड येथील दुचाकींचे काटवा मोटर्स, हायटेक मोटर्स, यश मोटर्स, सिव्हिल हॉस्पिटल शेजारील जगजंपी येथे खरेदीसाठी ग्राहकांची गर्दी होती. 

शाळा प्रवेश निश्‍चिती लाख मोलाची सोने खरेदी, रियल इस्टेटमधील गुंतवणुकीबरोबर आपल्या पाल्यांच्या शिक्षणावरही मोठी गुंतवणूक करण्याचा कल आहे. अनेक पालकांनी शहरातील नामवंत शिक्षण संस्थांत जाऊन अ‍ॅडव्हान्स फी देऊन शाळा प्रवेश निश्‍चित केला.