Mon, Apr 22, 2019 06:13होमपेज › Belgaon › १३० पेक्षा अधिक जागा जिंकू

१३० पेक्षा अधिक जागा जिंकू

Published On: Apr 06 2018 1:30AM | Last Updated: Apr 05 2018 9:22PMगोकाक : वार्ताहर

पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा यांनी जोरदार प्रचार करूनही अपेक्षित यश मिळाले नाही. आता कर्नाटक हे त्यांचे मुख्य लक्ष असले तरी राज्यात काँग्रेस 130 पेक्षा अधिक जागा जिंकून सिद्धरामय्याच पुन्हा मुख्यमंत्री होतील, असा दावा पालकमंत्री रमेश जारकीहोळी यांनी व्यक्त केला. 

गोकाक येथे आयोजित मेळाव्यात जारकीहोळी म्हणाले, पंतप्रधान मोदी यांनी गत लोकसभा निवडणुकीवेळी प्रत्येकाच्या नावे 15 लाख रु. जमा करण्याचे आश्‍वासन दिले होते. सबका साथ सबका विकास नारा दिला होता. मात्र त्यांची सारी आश्‍वासने खोटी ठरली आहेत. देश काँग्रेसमुक्‍त करणारे भाजप कर्नाटकातील मतदारच भाजपला हद्दपार करतील. 

गोकाक मतदारसंघातून सलग चार वेळा हजारो मताधिक्क्याने निवडून आलो आहे. यावेळी पाचव्यांदा विजय निश्चित आहे. माझे बंधू सतीश व लखन यांच्यात मतभेद नसून आमच्याविरोधात खोटी अफवा पसरवली जात आहे. आम्ही तिन्ही बंधू एकत्र येऊन जिल्ह्यात काँग्रेसचे 12 उमेदवार निवडून आणू. लखन जारकीहोळी भाजप नेत्यांना भेटले होते. मात्र ते भाजपकडे जाणार नाहीत. लखनसाठी गरज पडल्यास गोकाक मतदारसंघ सोडायला तयार आहे. गोकाक परिसराचा कोट्यवधी निधीतून विकास केला आहे. त्यामुळे परिसरातील सर्व समाजबांधवांनी योग्य विचार करावा, असे आवाहन त्यांनी केले.

माजी नगराध्यक्ष सिद्धलिंग दलवाई यांनी स्वागत केले. यावेळी जि. पं. सदस्य टी. आर. कागल, डॉ. राजेंद्र सन्नक्की, बसप्पा उरमट्टीगोळ, रामण्णा हुक्केरी यांची भाषणे झाली.