होमपेज › Belgaon › व्यवसाय शिक्षण शुल्कात वाढ

व्यवसाय शिक्षण शुल्कात वाढ

Published On: Jul 30 2018 1:28AM | Last Updated: Jul 30 2018 12:06AMबंगळूर : प्रतिनिधी

व्यवसाय  कोर्स  प्रवेश  शुल्कामध्ये 8 टक्के वाढ करण्यात आल्याबद्दल याला   हरकत घेऊन उच्च न्यायालयात याचिका दाखल झाली आहे. यावर उच्च न्यायलायाने शुल्क नियंत्रण समिती अध्यक्षाना नोटीस जारी करावी, असा आदेेश आरोग्य खात्याचे कनिष्ट कार्यवाह व कर्नाटक परीक्षा प्राधिकरणला बजावला आहे.

यासंदर्भात जेएसएस स्वायत्त विद्यापीठ व जेएसएस वैद्यकीय महाविद्यालयाच्या निबंधक बी.मंजुनाथ यानी सादर केलेल्या याचिकेवर न्यायमूर्ती ए.एस.बोपण्णा व न्यायमूर्ती मोहम्मद नवाज यांच्या खंडपीठाने गुरुवारी छाननी केली.

2018? 19 सालातील प्रवेशासाठी पहिल्या टप्प्यातील कौन्सिलिंग नुकतेच पूर्ण झाले आहे. आता दुसर्‍या टप्प्यातील कौन्सिलिंगची प्रतीक्षा करण्यात येत आहे. प्रवेशासाठी अंतिम मुदत 8 ऑगस्ट ही निश्‍चित करण्यात आली आहे. विद्यमान परिस्थितीत शुल्क वाढीसंदर्भात नियंत्रण समितीने गेल्या 27 जून रोजी जारी केलेली नोटीस ही बेकायदेशीर असल्याचा आरोप मंजुनाथ यानी केला आहे.

स्वायत्त विद्यापीठे ही सरकारकडून कोणत्याही रितीने अनुदान घेत नसतात. त्यामुळे त्याना व्यवसाय शिक्षण कायदा ( शुल्क निश्‍चिती? नियंत्रण) लागू होत नाही, असे याचिकाकर्त्याचे म्हणणे आहे.सर्वोच्च न्यायालयाच्या निर्देशानुसार उच्च न्यायालयाचे निवृत्त न्यायमूर्ती डी.व्ही.शैलेंद्रकुमार नेतृत्वातील शुल्क नियंत्रण समितीची रचना करण्यात आली होती. या समितीने खासगी व्यवसाय शिक्षण महाविद्यालयातील वैद्यकीय, दंत वैद्यकीय व अभियांत्रिकी कोर्स प्रवेश शुल्क गतवर्षातील शुल्कापेक्षा 8 टक्क्यांनी वाढ केली होती. यासंबंधीचा  आदेश 27 जून रोजी जारी करण्यात आला होता.